केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट आज(२८ एप्रिल) सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. शाहीर साबळे यांच्या व्यक्तिमत्वाचे व कारकीर्दीचे अनेक पैलू या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर उलगडण्यात येणार आहेत. बहुचर्चित असलेल्या या चित्रपटाच्या टीझरपासूनच प्रेक्षकांना प्रतीक्षा होती. टीझर व ट्रेलरप्रमाणेच या चित्रपटातील गाण्यांनाही विशेष पसंती मिळत आहे.

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं प्रचंड व्हायरल झालं आहे. हे गाणं सध्या रीलवर ट्रेंडिग आहे. चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटीही या गाण्यावर रील्स बनवत आहेत. किली पॉल व अमेरिकन सोशल मीडिया स्टार रिकी पाँड यांनीही या गाण्याची हुक स्टेप करत रील्स बनवले आहेत. आता प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी हिलाही ‘बहरला हा मधुमास’ गाण्याची भुरळ पडली आहे.

हेही वाचा>> दारूच्या नशेत श्रीदेवींना भेटायला गेलेला संजय दत्त, अभिनेत्रीच्या मेकअप रुमचा दरवाजा उघडला अन्…; नेमकं काय घडलं होतं?

देवोलिनाने ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर रील बनवला आहे. या व्हिडीओसाठी तिने खास लाल रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. हातात हिरव्या बांगड्या व पारंपरिक दागिन्यांचा साज करत मराठमोळा लूक केला आहे. ‘बहरला हा मधुमास’ गाण्याची हुक स्टेप केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. देवोलिनाचा हा व्हिडीओ चर्चेत असून त्यावर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> Samantha Birthday : नागा चैतन्यशी लग्न करण्याआधी ‘या’ अभिनेत्याबरोबर होतं समांथाचं अफेअर, लग्नही करायचं होतं, पण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात तो शाहीर साबळे यांच्या भूमिकेत आहे. केदार शिंदेंची लेक सना शिंदे या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटात तिने भानुमती साबळे ही भूमिका साकारली आहे.