Dharmaveer 2 Box Office Collection Day 1: ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट २०२२ साली प्रदर्शित झाला होता. शिवसेनेचे दिवंगत नेते व ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग ‘धर्मवीर २ – साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आला. शुक्रवारी (२८ सप्टेंबर रोजी) चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला.

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर २’ चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका अभिनेता प्रसाद ओक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिश दातेने साकारली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली, याची आकडेवारी समोर आली आहे. चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

‘नवरा माझा नवसाचा २’ने सातव्या दिवशी कमावले एक कोटी; एका आठवड्याचे कलेक्शन किती? जाणून घ्या

मंगेश देसाई यांनी चित्रपटाचे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी देण्यात आली आहे. चित्रपटाने दमदार ओपनिंग केली आहे. पहिल्या दिवशी ‘धर्मवीर २’ ने पहिल्या दिवशी १.९२ कोटी रुपये कमावले. २०२४ मध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा हा मराठी चित्रपट आहे, असं देसाई यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये पाहायला मिळतंय. “पहिल्याच दिवशी नेट १.९२ कोटी कमवून धर्मवीर -२ सिनेमा ठरला या वर्षीचा सगळ्यांत जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट !! संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून अभिनंदन!! धर्मवीर -२” असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिले आहे.

“अरबाजची आई म्हणते मी किती मुलींना घरात घेऊ, तू तिसरी…”, सर्वांसमोर आईचं विधान ऐकताच निक्कीला बसला धक्का; म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘धर्मवीर २’ या चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास तो ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, पण त्यावेळी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. पूरपरिस्थितीमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. आता शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झाला आहे आणि चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.