‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चार ऐतिहासिक चित्रपटानंतर आता लवकरच ‘सुभेदार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कामगिरीवर ‘सुभेदार’ हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. तसेच या चित्रपटाचे जोरदार प्रमोशनही सुरु असल्याचे दिसत आहे.

‘श्री शिवराज अष्टक’तील पाचवे पुष्प म्हणजे ‘सुभेदार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने या संपूर्ण टीमने एका रेडिओ चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत दिग्पाल लांजेकर यांनी चित्रपटादरम्यान येणाऱ्या अडचणी आणि काही किस्से शेअर केले. यावेळी दिग्पाल लांजेकरांनी चिन्मय मांडलेकरच्या मुलाचा एक किस्सा सांगितला.
आणखी वाचा : Video : “फक्त ५०० मावळे अन् कोंढाणा…”; अंगावर शहारे आणणारा ‘सुभेदार’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
case filed in Actor Aamir Khan deep fake tape case
अभिनेता आमिर खान डीपफेक चित्रफीतीप्रकरणी गुन्हा दाखल
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”

“‘श्री शिवराज अष्टका’तील पावनखिंड हा चित्रपट गेल्यावर्षी प्रदर्शित झाला. चिन्मय मांडलेकरचा मुलगा जहांगीर याने तो चित्रपट पाहिला आणि त्यानंतर तो खूप अस्वस्थ झाला. त्याने चिन्मयला सांगितलं की, ‘दिग्पाल काका चुकला’. त्यावर चिन्यमने त्याला ‘काय चुकलं’, असे विचारले.

त्यावर तो म्हणाला, ‘बाजीप्रभू त्या चित्रपटात शेवटी मरण कसे काय पावले, ते जाऊ शकत नाही. कारण ते मराठा योद्धा आहेत. ते जाऊ शकत नाही.’ याचाच अर्थ अनेक लहान मुलांना इतके ते त्यांना आपलेसे वाटले. त्या लहान मुलांना आता हे सुपरहिरो वाटतात, हीच खूप मोठी गोष्ट आहे”, असे दिग्पाल लांजेकरांनी म्हटले.

आणखी वाचा : ‘सुभेदार’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली, २५ ऑगस्टऐवजी ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

‘सुभेदार’ हा चित्रपट येत्या १८ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अजय पूरकर सुभेदार तान्हाजी मालुसरेंची व्यक्तिरेखा साकारत आहेत. तर त्यांच्या जोडीला चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, स्मिता शेवाळे, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी, उमा सरदेशमुख, अर्णव पेंढारकर इत्यादी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.