मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचे नावं ‘महाराष्ट्र शाहीर’ असं आहे. शाहीर साबळे हे केदार यांचे आजोबा आहेत. दिग्दर्शक केदार शिंदे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये केदार यांची लेक महत्त्वाच्या भूमिकेमध्ये काम करताना दिसेल. आता लेकीच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – Video : लोणावळ्यात रस्त्यालगतच्या दुकानात कणीस भाजत उभा राहिला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, चाहते म्हणाले, “साधेपणा आणि…”

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
Rohit Pawar Post Against Raj Thackeray
“तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक’ असं..”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यावर रोहित पवारांची पोस्ट

केदार शिंदे यांची लेक सना या चित्रपटामध्ये शाहिरांच्या पत्नीच्या भूमिकेमध्ये काम करताना दिसेल. आपली मुलगी रुपेरी पडद्यावर काम करणार म्हटल्यावर केदार यांनाही तिचा अभिमान वाटतो. सनाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी लेकीला एका वेगळ्याच अंदाजामध्ये शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबरीने तिचं कौतुकही केलं.

ते म्हणाले, “प्रिय सना… तशी रोजच भेटतेस. पण आज हे लिहिण्याचं कारण तुझा वाढदिवस. दरवर्षीप्रमाणे आजही तो आलाच. पण दरवर्षीपेक्षा यंदा त्याचं महत्त्व तुला जास्त वाटत असावं. कारण या वर्षी वाढदिवसाच्या दिवशी तू कॅमेऱ्यासमोर काम करत आहेस. हे येणारं वर्ष तुझ्यासाठी खूप आव्हानात्मक असणार आहे. कॅमेऱ्यासमोर येण्याचं तुझं तू ठरवलंस. त्याआधी गेले काही वर्ष मला सहाय्यक म्हणून मदत केलीस. माझ्या शिव्या, ओरडा हक्काने खाल्लास. खुप वेळा डोळ्यात पाणीसुध्दा आलं असेल. पण तू हू का चू केलं नाहीस. माझ्या टीममध्ये तुला राजकुमारीची वागणूक कधीच मिळू नये याकडे माझं लक्ष होतं. कारण, त्याशिवाय मिळणाऱ्या गोष्टीची तुला किंमत कधीच कळणार नाही.”

आणखी वाचा – Video : शरीराचा भार दोन्ही हातांवर अन्…; प्राजक्ता माळीचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल, चाहत्यांना देतेय फिटनेसचे धडे

“आता महाराष्ट्र शाहीर या सिनेमात तू माझ्या आजीची म्हणजे, भानुमती साबळे ही भुमिका करत आहेस. त्यासाठी तुझ्या इतकाच मी सुद्धा उत्सुक आहे. प्रेक्षकांनी माझ्या प्रत्येक कामावर भरभरून प्रेम केलं. तेच तुझ्याही वाट्याला येवो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. सना कलाकाराचं आयुष्य हे ईसीजी सारखं असतं. वर खाली आलेख आपल्याला अस्वस्थ करतो. कधी आनंद तर कधी दु:ख देतो. मायबाप प्रेक्षकांच्या पायावर डोकं ठेवलं तर आपले पाय आपसूकच जमिनीवर राहतात एवढं ध्यानात ठेव. तुझाच बाबा.” केदार शिंदे यांच्या या पोस्टवर त्यांचं त्यांच्या लेकीवर किती प्रेम आहे हे दिसून येतं.