फँड्री चित्रपटातील शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स असून ती फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या व्हिडीओवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. नुकताच राजेश्वरीने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Video: “हे असले चाळे…” ‘त्या’ व्हिडीओमुळे ‘फँड्री’ फेम राजेश्वरी खरात ट्रोल

राजेश्वरीने एक रील व्हिडीओ शेअर केला आहे. ‘प्रिटी गर्ल्स वॉक लाइक दिस’ या गाण्यावर ती वॉक करताना व्हिडीओत दिसत आहे. लायनिंगची टी शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये राजेश्वरीचा बॉसी लूक पाहून चाहते विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. तिच्या या व्हिडीओमध्ये टाटा हॅरिअर कारही दिसत आहे. अनेकांनी या कारचा उल्लेख करत तिच्या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.

‘खरं सांग ती गाडी दुसऱ्याची आहे ना..!!’, ‘या व्हिडीओत मला फक्त ती कार आवडली,’ अशा कमेंट्स काहींनी करत तिला ट्रोल केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
rajeshwarri kharat 1
राजेश्वरीच्या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट्स

तर, काही जणांनी काळी चिमणी घावायला पाहिजे, अशा कमेंट्स केल्या आहेत.