अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित, लिखित ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच समाजमाध्यमांवर झळकले आहे. दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाची घोषणा प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता प्रतीक गांधी यांनी आपल्या समाजमाध्यमावरून केली आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाचे घोषवाक्यच सगळं काही सांगून जाते, ‘इफ यू वाँट अ हॅप्पी एिण्डग, यू मस्ट नो व्हेअर टू एण्ड युअर स्टोरी’ या घोषवाक्याचा अर्थ आणि चित्रपटाच्या कथेशी असलेला त्याचा संबंध २३ फेब्रुवारी रोजी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर उलगडणार आहे.

हेही वाचा >>> “कमी वयात सोडून गेली”, पूनम पांडेच्या पब्लिसिटी स्टंटपासून अजित पवार अनभिज्ञ, भर सभेत व्यक्त केलं दु:ख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटात भरत दाभोळकर, सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, जयंत वाडकर, अभिनव पाटेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. इमॅजिन एन्टरटेन्मेंट अ‍ॅण्ड मीडिया, अनंत नारायण महादेवन फिल्म्स यांच्या सहयोगाने तयार झालेल्या ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाचे दिनेश बन्सल , जी. के. अग्रवाल आणि अनंत महादेवन निर्माते आहेत.  चित्रपटाबद्दल अनंत महादेवन म्हणतात, ‘जीवनाचा शेवट आनंदी व्हावा, असं वाटणाऱ्या प्रत्येक वयस्काच्या अस्तित्वाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट म्हणजे हृषीकेश मुखर्जीच्या ‘आनंद’ची दुसरी बाजू आहे. इच्छामरण हा एक असा विषय आहे, ज्याने या महामारीच्या काळात मला प्रभावित केले. भौतिकवादी दृष्टिकोनापेक्षा व्यावहारिक दृष्टिकोनाकडे त्यांचा कल वाढला. हा चित्रपट पाहून वृद्धांच्या मनातील घालमेल तरुणाईला नक्कीच कळेल’. या चित्रपटाने आधीच राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांवर  मोहोर उमटवली आहे.