लोककलावंत प्रभा शिवणेकर यांचं निधन झालं आहे. ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्यात त्यांनी गंगीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी लोकप्रिय असलेल्या प्रभा शिवणेकर यांचं अल्पशा आजाराने निधन झालं.

‘गाढवाचं लग्न’ हे हरिभाऊ वडगावकर यांनी लिहिलेलं प्रसिद्ध वगनाट्य आहे. या नाटकाला भारतीय केंद्रशासनाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. वगनाट्यात प्रभा शिवणेकर गंगीची भूमिका करायच्या. ’गाढवाचं लग्न’चे प्रयोग राज्यभरात झाले होते. या प्रयोगांसाठी दादू इंदुरीकरांचं जेवढं कौतुक व्हायचं तितकंच कौतुक व प्रसिद्धी प्रभा शिवणेकर यांना मिळाली. या भूमिकेसाठी प्रभा शिवणेकर यांना भारत सरकारच्या संगीत नाट्य अकादमीनं १९७४ साली तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव केला होता.

हिरवी पैठणी, नाकात नथ अन् चंद्रकोर, Cannes च्या रेड कार्पेटवर मराठी लूकमध्ये अवतरलेली ‘ती’ कोण? जगभरात होतेय चर्चा

प्रभा शिवणेकर या उत्तम अभिनय करायच्या. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक नाटकांमध्ये काम केलं. मात्र त्यांना ओळख ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्यातून मिळाली. अनेक वर्षे त्यांनी या वगनाट्यात गंगी ही भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकली. आपल्या कारकिर्दीत १०० हून अधिक भूमिका साकारणाऱ्या प्रभा शिवणेकर नाटकांच्या प्रयोगानिमित्त राज्यभर फिरायच्या. गाढवाचं लग्न’ या वगनाट्याचे प्रयोग तर राज्यातील अनेक खेड्यांमध्येही झाले होते. सोशल मीडियावरर प्रभा शिवणेकर यांना लोक श्रद्धांजली वाहत आहेत.

आई-वडील झोपल्यावर मध्यरात्री त्यांच्या खोलीत जायची जान्हवी कपूर, कारण सांगत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रभा शिवणेकर या अविवाहित होत्या. त्यांच्या निधनाने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. प्रभा शिवणेकर आपल्या बहीण व भावांबरोबर राहायच्या. त्यांच्या भावंडांनीच त्यांचा शेवटपर्यंत सांभाळ केला. प्रभा शिवणेकर यांच्यावर मुळशी तालुक्यात त्यांच्या मूळ गावी शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.