scorecardresearch

Premium

आईला ‘या’ नावाने हाक मारतो गश्मीर महाजनी; म्हणाला, “माझे वडील त्यांच्या आईला…”

आईला ‘या’ नावाने हाक मारण्याच्या कारणाचा गश्मीर महाजनीने केला खुलासा, वाचा सविस्तर

gashmeer mahajani calls ammi to his mother
गश्मीर महाजनी आईला कोणत्या नावाने हाक मारतो? वाचा

मराठी अभिनेता गश्मीर महाजनी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देत असतो. त्याच्या आईचं नाव माधवी महाजनी आहे. तो आईला कोणत्या नावाने हाक मारतो, याचा खुलासा त्याने केला आहे. तसेच त्यामागचं कारणही त्याने सांगितलं आहे. गश्मीर आईला आई म्हणत नाही तर अम्मी म्हणतो.

“दुसरी आई बनून तिने…”, वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच मोठ्या बहिणीबद्दल बोलला गश्मीर महाजनी

chandrapur crime news, son killed mother, son killed mother with axe marathi news
चंद्रपूर : पोटच्या गोळ्यानेच आईला संपवले, कुऱ्हाडीने केली हत्या; वडील जखमी
love triangle nagpur
‘पती, पत्नी और वो…’ प्रेमाच्या त्रिकोणातून दोन संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; भरोसा सेलने…
Abhishek Ghosalkar Live (1)
VIDEO : अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबाराचा थरार समोर, कथित हल्लेखोराने स्वतःच्याच फेसबुकवरून केलं होतं लाईव्ह
throws puppy noida
संतापजनक! सात वर्षांच्या मुलाने कुत्र्याच्या पिल्लाला २० फुटावरून फेकलं, FIR नंतर रहिवाशांचे आंदोलन

रविवारी गश्मीरने इन्स्टाग्रामवर ‘Ask Gash’ हे सेशन ठेवलं होतं. यावेळी बहिणीबद्दल बोलताना त्याने आईचा उल्लेख अम्मी असा केला होता. त्यानंतर त्याला आईला अम्मी म्हणण्यामागचं कारण विचारण्यात आलं, त्याचं उत्तर गश्मीरने दिलं.

gashmeer mahajani post for sister
गश्मीर महाजनीने आईचा अम्मी असा उल्लेख केला ती स्टोरी

तुम्ही तुमच्या आईला अम्मी का म्हणता, असा प्रश्न त्याला एका चाहत्याने विचारला. त्याचं उत्तर देताना गश्मीरने कारण सांगितलं. “माझे वडील त्यांच्या आईला याच नावाने हाक मारायचे, खूप लहान असताना ऐकले होते, तेव्हापासून हे नाव तोंडात बसले,” असं गश्मीर म्हणाला.

gashmeer mahajani calls ammi to mother
आईला अम्मी का म्हणतो, यामागचं गश्मीरने सांगितलेलं कारण

दरम्यान, गश्मीरने यावेळी अनेक इतर प्रश्नांची उत्तरंही दिली. मोठ्या बहिणीबाबतही त्याने सांगितलं. मोठ्या बहिणीने आपला दुसरी आई म्हणून सांभाळ केल्याचं गश्मीर म्हणाला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gashmeer mahajani calls ammi to his mother madhavi mahajani reveals reason hrc

First published on: 11-09-2023 at 13:25 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×