मनोरंजनसृष्टीतील हॅण्डसम हंक अशी ओळख असणारा अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी. तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या गश्मीरने मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही अभिनयाची छाप पाडली. अभिनयाचा वारसा मिळालेल्या गश्मीरने अल्पावधीतच स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

गश्मीर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. त्याचा चाहता वर्ग मोठा असून सोशल मीडियाद्वारे तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. गश्मीर सध्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा>>‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबची आयुष्मान खुरानासाठी खास पोस्ट, म्हणाली…

शूटिंगदरम्यान गश्मीरला एका चाहत्याचा फोन आला. गश्मीर हा मूळचा काश्मीरचा आहे, असा गैरसमज त्याला झाला होता. यावर उत्तर देत गश्मीर म्हणाला “माझ्या नावावरुन मी काश्मीरचा आहे, असं वाटतं. पण मी काश्मीरचा नाही तर मुंबईचा आहे”. त्याने या व्हिडीओला कॅप्शनही तसंच दिलं आहे. “मी काश्मीरचा नाही, माझं फक्त नाव गश्मीर आहे” असं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>>‘दृश्यम २’ चित्रपटाने २०० कोटींची कमाई केल्यानंतर अजय देवगण भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाला…

हेही वाचा>> Video: “जरीच्या साडीत…” लग्नानंतर अक्षयाने पहिल्यांदाच शेअर केला व्हिडीओ; नववधूच्या साजश्रृंगाराची दिसली झलक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गश्मीर त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतो. गश्मीरने अनेक मराठी व हिंदी चित्रपटात काम केलं आहे. ओटीटीवरील अनेक वेब सीरिजमध्येही तो झळकला आहे.