मराठी चित्रपटांसह हिंदी मालिका व रिअॅलिटी शोमध्ये काम करून अफाट लोकप्रियता मिळवणारा अभिनेता गश्मीर महाजनी सध्या चर्चेत आहे. चर्चेत असण्याचं कारण म्हणजे त्याच्या आईचं आत्मचरित्र होय. गश्मीरची आई व दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांची पत्नी माधवी महाजनी यांनी आत्मचरित्र लिहिलं आहे, ते २९ जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात आलं. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर पहिल्यांदाच गश्मीरने सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली.

गश्मीरने इन्स्टाग्रामवर ‘आस्क गॅश’ हे सेशन ठेवलं होतं. यात त्याने चाहत्यांनी विचारलेल्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्याबद्दलची सर्व उत्तरं दिली. एका चाहत्याने गश्मीरला वडिलांबद्दल विचारलं. तुझ्या वडिलांवर कधी बायोपिक बनली, तर तुला त्यात त्यांची भूमिका करायला आवडेल का? यावर “जर बायोपिकची निर्मिती मी करणार असेल तरच करेन. सर्वकाही जबाबदारीने दाखवले आहे याची खात्री करण्यासाठी,” असं उत्तर गश्मीरने या प्रश्नाचं दिलं.

gashmeer mahajani 1
गश्मीर महाजनीची पोस्ट

“आईला उलट्या, कुजलेल्या मांसाचा वास अन्…”, गश्मीर महाजनीला वडिलांच्या निधनाचे ‘असे’ मिळालेले संकेत; म्हणाला…

गश्मीरला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. ‘हे आत्मचरित्र आठवणींनी गंधाळ झालेले असणार यात शंकाच नाही. पण बाबांसाठी तुम्ही स्वतः काही लिहिण्याचा मानस आहे का?’ यावर गश्मीर म्हणाला, “एक स्वप्न आहे.
ते रोज येतं.
कितीही दुर्लक्ष केलं तरी माझ्या मानगुटीवर बसून राहतं.
मी म्हणतो जा बाबा, माझ्यावर जबाबदाऱ्या खूप आहेत! पण ते काही हलत नाही, जणू त्याचं माझ्याविना कुणीच नाही.
मी काही देणं लागतो त्याचं असं म्हणतं ते मला.
माझंच स्वप्न आहे ते. लहानपणापासून पाहायचो.
तरुण होतं तेव्हा खूप उद्दाम होतं.
म्हातारं झालं आणि लाचार झालं. आमची नाळ जोडलेली आहे जीवन मरणापलिकडे,” असं उत्तर गश्मीरने दिलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
gashmeer mahajani 2
गश्मीर महाजनीची पोस्ट

दरम्यान, गश्मीर महाजनीचे वडील अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाची बातमी १५ जुलै २०२३ रोजी समोर आली होती. वडिलांच्या निधनानंतर काही काळ गश्मीरने ब्रेक घेतला होता. आता त्याने चित्रपट व वेब सीरिजचं शूटिंग परत सुरू केलं आहे. लवकरच तो नव्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीला येईल.