"माझे अश्रू आणि यश...", बालपणीचे फोटो शेअर करत जिनिलिया देशमुखची आईसाठी खास पोस्ट | genelia deshmukh shared special post for her mother | Loksatta

“माझे अश्रू आणि यश…”, बालपणीचे फोटो शेअर करत जिनिलीया देशमुखची आईसाठी खास पोस्ट

ती सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

“माझे अश्रू आणि यश…”, बालपणीचे फोटो शेअर करत जिनिलीया देशमुखची आईसाठी खास पोस्ट

अभिनेत्री जिनिलीया देशमुख ही सध्या तिच्या आगामी ‘वेड’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आज जिनिलीया देशमुखने तिच्या आईच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने आईबरोबर काढलेले तिच्या बालपणीचे फोटो शेअर केले.

यातील पहिल्या फोटोत जिनिलीया तिच्या आईच्या कडेवर बसली आहे आणि कॅमेऱ्याकडे पाहत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती अगदीच लहान असून तिच्या डोक्याला टोपरं बांधलेलं दिसत आहे. त्यानंतरचा तिचा एका फोटो तिच्या तरूणपणीचा असून ती आईबरोबर कॅमेऱ्याकडे बघत स्मितहास्य देत आहे.

आणखी वाचा : “मुंबईच्या ज्या रस्त्यांवरून आजपर्यंत…” अदिती द्रविड रमली जुन्या आठवणीत

हे सगळे फोटो पोस्ट करताना तिने आईसाठी एक खास पोस्ट लिहिली. तिने लिहिलं, “अनेक वेळा मी तुझे आभार मानायला विसरले आणि त्याहूनही अधिक वेळा मी व्यक्त झाले नाही. पण आज मला सांगायचंय. जेव्हा तू शांतपणे माझं सगळं ऐकून घेतेस ते मला खूप आवडतं. तू मला दाखवलेला पाठिंबा, माझे अश्रू आणि माझं यश वाटून घेतल्याबद्दल धन्यवाद. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आई खूप ग्रेट आहेस. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”

हेही वाचा : अथांग समुद्र, रोमान्स आणि वेड्यासारखं प्रेम; चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

दरम्यान वेड या मराठी चित्रपटाद्वारे जिनिलीया देशमुख ही तब्बल १० वर्षांनी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुख करत आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकर इत्यादी कलाकार या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 18:29 IST
Next Story
“मुंबईच्या ज्या रस्त्यांवरून आजपर्यंत…” अदिती द्रविड रमली जुन्या आठवणीत