गेल्या काही दिवसांपासून अभिनेता चिन्मय मांडलेकर खूप चर्चेत आहे. चर्चेचं कारण हे सर्वश्रृत आहे. चिन्मयला त्याचा मुलगा ‘जहांगीर’च्या नावावरून अजूनही ट्रोल केलं जात आहे. या ट्रोलिंगला संतापून चिन्मय व त्याची पत्नी नेहा जोशी-मांडलेकरनं व्हिडीओच्या माध्यमातून आपलं मत स्पष्ट केलं होतं. एवढंच नव्हे तर चिन्मयनं एक मोठा निर्णय देखील घेतला. यापुढे कधीही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही, असं अभिनेत्यानं जाहीर केलं. अजूनही हे प्रकरण सुरुच आहे. कलाकार मंडळींसह चाहते चिन्मयच्या निर्णयावर परखड मतं व्यक्त करत आहेत. अशातच प्रसिद्ध कवयित्री डॉ. प्रज्ञा दया पवार यांच्या पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – अखेर मुहूर्त ठरला! विशाल निकम व पूजा बिरारीची ‘येड लागलं प्रेमाचं’ नवी मालिका लवकरच होणार सुरू, ‘या’ लोकप्रिय मालिकेची घेणार जागा

डॉ. प्रज्ञा दया पवार यांची पोस्ट वाचा…

संदर्भ : नाव जहांगीर

मुळात फक्त भूमिका चोख वठवून चालत नाही. त्या भूमिकांच्या संहितांचं सांस्कृतिक राजकारण बेदखल करून त्यांचा अजेंडा पुढे नेला तर गत अशी काहीच्या बाही होऊन बसते. भूमिका वठवण्याआधी भूमिका घ्यावी लागते. ती संविधानवादी आहे की संविधानाला नेस्तनाबूत करणारी आहे? देशाची गंगा-जमनी तहजीब, बहुलतावादी संस्कृती उंचावणारी आहे, की ती नष्ट करुन अल्पसंख्यांकादि अन्यांप्रती तिरस्कार आणि घृणा निर्माण करणारी आहे, याचा निर्णय कलावंत म्हणून कधीतरी घ्यावाच लागतो. उगीच नाही; ‘पार्टनर, तेरी पॉलिटिक्स क्या है’ हा प्रश्न विचारला होता गजानन माधव मुक्तिबोधांनी…

बाकी पूर्ण सहानुभूती आहेच! जे घडतंय ते अतिशय विदारक आहे. अखलाकला ठेचून मारलं केवळ फ्रीजमध्ये बीफ असावं, या संशयामुळे…मोहसीनला पुण्यात हकनाक संपवलं..ही अशी कैक उदाहरणं. त्यावेळीही जाहीर बोललं गेलं असतं तर बरं झालं असतं. काळ माफ करत नसतो!…जहांगीरच्या कोवळ्या मनावर जे व्रण पडताहेत त्यातून तो बरंच काही शिकेल. कदाचित तो अधिक व्यापक होईल. कदाचित अधिक सहिष्णु. तसं त्यानं व्हावं हीच सदिच्छा.

हेही वाचा – “जहांगीर…”, चिन्मय मांडलेकरच्या लेकाच्या नावावरील ट्रोलिंगवर सुप्रिया पिळगावकरांची मार्मिक पोस्ट, म्हणाल्या…

‘जहांगीर’ नावाचा अर्थ

दरम्यान, चिन्मय मांडलेकरची पत्नी नेहा जोशी-मांडलेकरनं तिच्या व्हिडीओमध्ये लेकाच्या ‘जहांगीर’ नावाचा अर्थ सांगितला होता. ती म्हणाली होती, “माझ्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ आहे. ‘जहांगीर’ हे पर्शियन नाव आहे. माझ्या मुलाचा जन्म २१ मार्च २०१३ला झाला होता. २१ मार्चला जमशेदी नवरोज असतो. त्या जमशेदी नवरोज दिवशी त्याचं नाव ‘जहांगीर’ (Jehangir) असं ठेवलं गेलं. नाव कोणावरून ठेवलं? कसं ठेवलं? तो मुद्दा नंतर येतो. मुळात या नावाचा अर्थ फार सुंदर आहे. ‘जहांगीर’ म्हणजे जगज्जेता. जग जिंकलेला ‘जहांगीर’. तर मला माहित नाही इतर माणसं आपल्या मुलाची नावं कशी ठेवतात. मी तरी माझ्या दोन्ही मुलांची नाव त्या नावाचा अर्थ फार गोड आहे, म्हणून ठेवली आहेत. शिवाय भारतरत्न जेआरडी टाटा यांचं नावही ‘जहांगीर’ आहे. टाटा कुटुंब माझ्यासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी प्रेरणादायी कुटुंब संस्था आहे. त्यामुळे ‘जहांगीर’ या नावाचा अर्थ आवडला.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poetess pradnya daya pawar reaction on chinmay mandlekar getting trolled for his son name jehangir pps
First published on: 24-04-2024 at 14:53 IST