scorecardresearch

“रिफ्रेश होण्यासाठी लोक गोव्याला जातात पण…” हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

सोशल मीडियावर बिनधास्तपणे व्यक्त होणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी.

“रिफ्रेश होण्यासाठी लोक गोव्याला जातात पण…” हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

सोशल मीडियावर बिनधास्तपणे व्यक्त होणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. एखादा सामाजिक विषय असो किंवा खासगी आयुष्यामधील एखादा प्रसंग असो हेमांगी याबाबत अगदी खुलेपणाने बोलताना दिसते. सोशल मीडियावर कायमच सक्रिय असणारी ही अभिनेत्री फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. आता तिने नुकताच तिचा एक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करताना तिने ती रिफ्रेश होण्यासाठी काय करते हे सांगितलं आहे.

आणखी वाचा : शरीरावर जखमा, शर्टवर रक्त…रणबीर कपूरचे फोटो पाहून चाहते काळजीत

अनेक सेलिब्रिटी कामातून वेळ काढत त्यांची फिरण्याची आवड जोपासत असतात. हेमंगी ही त्यातलीच एक कलाकार. तिलाही भटकंतीची फर आवड आहे. ती कधी कुठे फिरायला गेली तर तेथील फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत त्यांना तयाची माहिती देत असते. आताही ती रिफ्रेश होण्यासाठी मुंबईच्या बाहेर गेली आहे आणि तिने स्वतःचा एक फोटो पोस्ट करत याची माहिती दिली आहे. पण हा फोटो पोस्ट करताना तिने लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा : “काल मला माझी दुर्गा भेटली…” हेमांगी कवीने ‘या’ अभिनेत्रीसाठी केलेली खास पोस्ट चर्चेत

हेमंगीने तिचा कारमधील एक सेल्फी पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करताना तिने लिहिलं, “रिफ्रेश व्हायला लोक गोव्याला जातात आपण ‘गावाला’ जातो!…सिद्धनाथ यात्रा कॉलिंग…” ती तिच्या गावी म्हसवडला गेली आहे. तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेक जणांनी कमेंट करत तिच्या गावाबद्दलच्या ओढीचं कौतुक केलं आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या