करोना काळानंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट म्हणजे झिम्मा. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच जादू केली होती. जगभरातल्या प्रेक्षकांनी ‘झिम्मा’वर भरभरून प्रेम केले. त्यानंतर आता लवकरच ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

‘झिम्मा’ या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, अनंत जोग, चैत्राली गुप्ते या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकरल्या होत्या. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. नुकतंच अभिनेत्री सायली संजीवने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा :‘झिम्मा’च्या घवघवीत यशानंतर चित्रपटाचा दुसरा भाग ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, टीझर प्रदर्शित

सायली संजीवने नुकतंच एक टीझर प्रदर्शित केला आहे. यात तिने “तुमचे आमचे रियुनियन- झिम्मा २” असे म्हटले आहे. “पुढच्या ट्रिपची तारीख ठरली… आनंदाची गाडी सुटली! २४ नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात…”, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे.

हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत निर्मिती संस्था ‘कलर यल्लो प्रोडक्शन’ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी या चित्रपटाची प्रस्तुती करणार आहेत. चलचित्र मंडळी आणि क्रेझी फ्यु फिल्म्स निर्मित हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा : ‘वीर सावरकर : सिक्रेट फाइल्स’च्या शूटींगला सुरुवात, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास उलगडणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आनंद एल. राय आणि क्षिती जोग या चित्रपटाचे निर्माते आहेत आणि विराज गवस, उर्फी काझमी, अजिंक्य ढमाळ हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, अनंत जोग, चैत्राली गुप्ते या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकरल्या होत्या.