Hemant Dhome Shared A Post : हेमंत ढोमे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय दिग्दर्शक आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. हेमंत एक उत्तम अभिनेताही आहे. तो सोशल मीडियावरही विशेष सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा हेमंत सामाजिक घडामोडींविषयी यामार्फत त्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतो. तर कधी त्याच्या दैनंदिन जीवनातील घडामोडीही तो शेअर करतो.
हेमंत सोशल मीडियामार्फत त्याची बायको क्षिती जोग व इतर कलाकार मित्रमंडळींच्या वाढदिवसानिमित्त अनेकदा पोस्ट शेअर करीत त्यांना त्याच्या हटके अंदाजात शुभेच्छा देत असतो. अशातच आता हेमंतने नुकतीच सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर केली आहे. हेमंतच्या आईचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याने ही पोस्ट केली आहे.
हेमंतने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करीत यावेळी त्याच्या आईचा फोटो शेअर केला आहे. हेमंतची आई त्यांच्या शेतात असताना हा फोटो काढला असल्याचं यामधून पाहायला मिळतं. त्यानं या फोटोला “वाढदिवसाच्या शुभेच्छा थोरल्या पाटलीणबाई” whole वावर is our! अशी खास कॅप्शन देत त्याच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेमंत अनेकदा त्याच्या कुटुंबीयांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत असतो. अनेकदा तो त्याची बायको, बहीण, आई-वडिलांबरोबरचे अनेक फोटो, रील पोस्ट करताना दिसतो. हेमंतचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. हेमंत व क्षिती ही जोडी मराठीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. या दोघांची ‘चलचित्र मंडळी’ अशी स्वत:ची निर्मिती संस्थासुद्धा आहे. त्यामार्फत ते त्यांच्या चित्रपटांची निर्मिती करतात.
दरम्यान, हेमंतच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर काही दिवसांपूर्वी हेमंतचा ‘फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये मराठी इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध कलाकार झळकले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटासह त्यानं आजवर ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘सातारचा सलमान’, ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’, ‘फसक्लास दाभाडे’ यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.