‘दुर्वा’ या मालिकेमुळे ऋता दुर्गुळेला खरी ओळख मिळाली. या मालिकेनंतर ‘फुलपाखरु’, ‘मन उडू उडू झालं’ यांसारख्या मालिकांमध्ये तिने उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. आता तर मालिकांमधून ब्रेक घेत ऋता मराठी चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे. ऋता तिच्या कामाबरोबरच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. आता तिने पती प्रतिक शाहबरोबर शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आला आहे.

आणखी वाचा – प्राजक्ता माळीचा पुण्यामध्ये आहे ‘हा’ व्य़वसाय, अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली, “अजूनही…”

काही दिवसांपूर्वीच ऋताची बहीण साक्षी दुर्गुळे विवाहबंधनात अडकली. महाबळेश्वरमधील एका रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. ऋताने यादरम्यानचे अनेक व्हिडीओ व फोटोही सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले. त्याचबरोबरीने ऋताने बहिणीच्या संगीत सोहळ्यादरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला.

या व्हिडीओमध्ये ऋता व प्रतिक रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. ‘रंगी सारी गुलाबी’ या गाण्यावर ऋता व प्रतिकने रोमँटिक डान्स केला. त्यांचा हा डान्स सुरु असताना उपस्थितांनी टाळ्या वाजवत त्यांना दाद दिली. या दोघांच्या या डान्स व्हिडीओला सोशल मीडियावरही अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे.

आणखी वाचा – अशी दिसते देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांची लेक, खास पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “दिविजा तुला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवाय या लग्नादरम्यानचे दोघांचे एकत्रित व सुंदर फोटो ऋताने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. सुंदर जोडी, तुम्ही दोघांनी अगदी उत्तम डान्स केला आहे अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात ऋता व प्रतिक विवाहबंधनात अडकले. दोघंही एकमेकांबरोबरचे फोटो व व्हिडीओ शेअर करत खुलेपणाने प्रेम व्यक्त करताना दिसतात.