करोना काळानंतर पहिला प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट म्हणजे 'झिम्मा'. या चित्रपटात सात अभिनेत्री प्रमुख भूमिकेत झळकल्या होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच जादू केली होती. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर आणि दोन पोस्टरही प्रदर्शित झाले आहेत. पण आता यातील एका नव्या पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ‘झिम्मा’ या चित्रपटाच्या पहिल्या भागात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले या अभिनेत्री झळकल्या होत्या. आता 'झिम्मा २' या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरवर सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी देशपांडे दिसत नाहीत. त्यामुळे नेटकऱ्यांनी याबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.आणखी वाचा : “दुसरं लग्न कधी करणार?” तेजस्विनी पंडित म्हणाली, “माझ्या आयुष्यात पुरुष…” 'झिम्मा २' या चित्रपटाच्या नव्या पोस्टरवर सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, क्षिती जोग यांच्याबरोबर रिंकू राजगुरु आणि शिवानी सुर्वे झळकत आहेत. त्याबरोबरच यात सिद्धार्थ चांदेकरही पाहायला मिळत आहे. हे नवीन पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी सोनाली कुलकर्णी का नाही, असा प्रश्न विचारला आहे. "मृण्मयी देशपांडे का दिसत नाही", असे काहींनी विचारले आहे. तर काहींनी "सोनाली आणि मृण्मयीला रिप्लेस का केलं", असे विचारले आहे. "सोनाली कुलकर्णी चित्रपटाच्या पोस्टरवर का नाही", असा प्रश्न काहींनी विचारला आहे. तर काहींनी "मृण्मयी गोडबोले???" अशी कमेंट केली आहे. यात "सोनाली कुलकर्णी का नाहीये part 1 मधे होती ना", असे एकाने म्हटले आहे. तर एकाने "सोनाली कुठे आहे? तिच सरप्राईज आहे का?" अशी कमेंट एकाने केली आहे. 'झिम्मा २' चित्रपटाच्या पोस्टरवरील कमेंट आणखी वाचा : “रात्रीचा एकटीने प्रवास, बाईकने पाठलाग करणारी दोन माणसं अन्…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ भयानक अनुभव, म्हणाली… दरम्यान 'झिम्मा २' या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. त्यात इंदू डार्लिंगचा ७५ वा वाढदिवस, नवीन ट्रीपचे प्लॅनिंग आणि एक सरप्राईज असा सस्पेन्स पाहायला मिळत आहे. एकीकडे या चित्रपटाच्या पोस्टरवर सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी देशपांडे दिसत नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे यात रिंकू आणि शिवानी नक्की कोणत्या भूमिकेत दिसणार असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.