आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. संपूर्ण जगातील क्रिकेटप्रेमींच लक्ष सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याकडे लागलं आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट संघाच्या हातून हा विश्वचषक सुटण्याची अधिक शक्यता वाढली आहे. हे पाहून काही मराठी अभिनेत्रींनी टीव्ही बंद केला आहे.

हेही वाचा – Video: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावेळी शाहरुख खानच्या कृतीने वेधलं लक्ष, आशा भोसलेंच्या हातात कप पाहिला अन्…

‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री जुई गडकरी हिने टीव्ही बंद केल्याची स्टोरी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “चला…टीव्ही बंद करतेय”, असं तिने लिहीलं आहे. तसेच याआधी स्टोरीमध्ये जुईने प्रत्येक ओव्हरला ऑस्ट्रेलियाची एक विकेट जावी अशी इच्छा व्यक्त केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुई व्यतिरिक्त अभिनेत्री हेमांगी कवीने हिने विराट कोहलीच्या विकेटनंतर टीव्ही बंद केल्याची स्टोरी शेअर केला आहे. ज्यामध्ये हेमांगीने लिहीलं आहे, “टीव्ही बंद, अब जो होगा सो होगा…”