बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं सध्या चांगलेच ट्रेंड होताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम, युट्यूब, फेसबुक उघडल्यावर ‘बहरला हा मधुमास’ हे एकच गाणं कानावर पडत आहे. या गाण्याची अनेक कलाकारांना, इन्स्टाग्राम रिल स्टार्सला तसेच सर्वसामान्यांना भूरळ पडली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध रील स्टार किली पॉलला आणि त्याची बहिण निमा पॉल हिलाही या गाण्याची भूरळ पडली आहे. नुकतंच त्यांनी या गाण्यावर एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे.

किली पॉल अनेक भारतीय गाण्यावर रील बनवत असतो. आतापर्यंत त्याने अनेक बॉलिवूड गाण्यांवर रील्स बनवले आहेत. नुकतंच त्याने ‘बहरला हा मधुमास’ या लोकप्रिय मराठी गाण्यावर रील बनवला आहे. याला कॅप्शन देताना तो म्हणाला, “मला गाणे आणि डान्स दोन्हीही फार आवडले.”
आणखी वाचा : “माझा रोमँटिक अंदाज पाहून पत्नीला धक्का बसला”, प्रवीण तरडेंनी केलेले ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाले “ती सोडून…”

या व्हिडीओत किली पॉल आणि त्याची बहिण हुबेहुब हुकस्टेप करताना दिसत आहे. यात निमा पॉल हिने अभिनेत्री सना शिंदे हिच्याप्रमाणे गाण्यातील हुकस्टेप कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे ती या गाण्याचे लिपसिंकही करताना दिसत आहे.

त्या दोघांच्या या व्हिडीओला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अनेक मराठी प्रेक्षकांनी यावर कमेंट करत त्याला प्रतिसाद दिला आहे. ‘जय महाराष्ट्र’, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “भाऊ तू आमच्या मराठी प्रेक्षकांना खुश केल्याबद्दल तुला प्रेमाचा जय महाराष्ट्र”, असे म्हटले आहे. ‘नीमा ताई तुम्ही फार छान डान्स केलात आणि किली भाऊ तुम्हीही’, अशी कमेंट एकाने केली आहे.

आणखी वाचा : Video : किली पॉललाही पडली नाटू नाटू’ गाण्याची भुरळ; हुकस्टेप करत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं गुरू ठाकूर यांनी लिहिलं आहे. अजय-अतुल यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे तर प्रसिद्ध बॉलिवूड गायिका श्रेया घोषालने हे गाणं गायलं आहे. ‘बहरला हा मधुमास’ गाण्याचं नृत्य दिग्दर्शन कृति महेशने केलं आहे. तर किली पॉल हा दक्षिण आफ्रिकेच्या तंजानियामधील एक प्रसिद्ध रील स्टार आहे. तो सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर ४ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स पाहायला मिळतात.