काही महिन्यांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणारे अभिनेते किरण माने सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते फेसबूकवर अनेक विषयांवरची त्यांची परखड मतं मांडत असतात. राजकीय व सामाजिक विषयांवरही ते पोस्ट करत असतात. आता त्यांनी केलेली एक पोस्ट चर्चेत आहे, या पोस्टमध्ये त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे, अशी चर्चा होत आहे.

“मी दुसऱ्याची तिजोरी फोडली आणि श्रीमंत झालो यात अभिमान कसला? शरम वाटली पाहिजे. तुला तुझ्या हिमतीवर एक पै कमावता आली नाही, हा तुझा नाकर्तेपणा आहे. तुझा एकही ‘बंदा’ तुला मोठा करता आला नाही. फोडून आणलेल्या खजिन्यातल्या चवल्या-पावल्यांचा तुला सतत टेकू लागतो. तू सगळ्यात मोठा दरिद्री आहेस,” अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे, या पोस्टबरोबर #ज्याचीलाजत्याचाच_माज असा हॅशटॅग त्यांनी दिला आहे.

Liquor license also in the name of Mahayuti candidate Sandipan Bhumre wife
भुमरेंच्या पत्नीच्या नावेही मद्य परवाना
salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड

“नार्वेकरांनी ‘खरी’ ठरवलेली शिवसेना बाळासाहेबांचं…”, किरण मानेंचा शिंदे गटाला टोला; म्हणाले, “…ये मेरी गॅरंटी है”

किरण मानेंच्या या पोस्टवर नेटकरीही कमेंट्स करत आहेत. ‘याचा सरळ अर्थ याच्या बापजाद्याची श्रीमंत व्हायची लायकी नव्हती आणि अक्कलही नव्हती त्यांना…!’, ‘सत्तेचा माज आणि उर्मटपणाचा कळस आहे हा. आज ना उद्याला उतरल्यावरच समजेल,’ ‘ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे ती अभिमानाने सांगतात .. पुन्हा आलो ते पण दोन पक्ष फोडून. यायचं होत तर स्वत:च्या पक्षाच्या बळावर यायचं होत. दुसऱ्यांची घर फोडून कुटुंब फोडून जीवा भावाची माणस तोडून जे आनंद मिळवू शकतात ते कधी ही कोणाचा ही बळी देऊ शकतात आणि सर्वांत आधी बळी ते बाहेरून आलेल्यांचा देणार,’ अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.

“ओS मानेS याSSS”, जेव्हा विमानात शिरताच किरण मानेंना ऐकू आला आवाज; म्हणाले, “दचकून बघितलं तर…”

किरण मानेंचा रोख देवेंद्र फडणवीसांकडे?

किरण मानेंनी केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्टवरील कमेंट्स पाहता त्यांचा रोख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आहे का? असा प्रश्न पडतोय. “मी म्हटलं होतं की मी पुन्हा येईन. त्याला अडीच वर्षे लागली. परंतु, अडीच वर्षांनी आलो तर असा आलो की दोन्ही पक्ष फोडून आलो”, असं फडणवीस दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीकाही केली होती. याचदरम्यान किरण मानेंनी ही पोस्ट केली आहे.