Premium

“तुमच्या व्हिडीओने वेळ वाया घालवला…,’ नेटकऱ्याच्या कमेंटला क्रांती रेडकरचं सडेतोड उत्तर, म्हणाली…

क्रांती रेडकर नेहमीच मजेशीर व्हिडीओ शेअर करत असते. आताही तिने लिफ्टमध्ये येणारी माणसं कशा कशा प्रकारची असतात हे तिच्या हटके अंदाजात सांगितलं.

kranti redkar

अभिनेत्री क्रांती रेडकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेली अनेक वर्षं ती वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेही अनेकदा लक्ष वेधून घेत असते. मजेशीर रील्स पोस्ट करत असते. आता अशाच एका तिच्या रीलवर एका नेटकऱ्याने केलेली कमेंट आणि त्याला क्रांतीने दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रांती रेडकरने आज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचं एक विनोदी रील शेअर केलं. या रीलमध्ये तिने लिफ्टमध्ये येणारी माणसं कशा कशा प्रकारची असतात, हे तिच्या हटके अंदाजात सांगितलं. पण एका नेटकार्‍याला हे रील अजिबात आवडलं नाही आणि त्याने या रीलवर नकारात्मक कमेंट केली.

आणखी वाचा : Video: क्रांती रेडकरने दीड आठवड्यात कमी केलं २.५ किलो वजन, सिक्रेट शेअर करत म्हणाली, “गेले काही दिवस मी…”

क्रांतीने हे मजेशीर रील शेअर करताच एकाने कमेंट करत लिहिलं, “मॅम, या व्हिडीओने माझी दहा मिनिटं वाया घालवली. समजलं काही नाही पण माझा वेळ वाया घालवल्याबद्दल धन्यवाद.” या कमेंटला क्रांतीने देखील जसंच्या तसं उत्तर दिलं. तिने लिहिलं, “आणि तुमची कमेंट वाचून माझीही दहा मिनिटं वाया गेली.”

हेही वाचा : Video: “यापूर्वी माझ्या कोणत्याच चित्रपटाच्या सेटवर…” क्रांती रेडकरच्या व्हिडीओने वेधलं लक्ष

तर आता क्रांतीने दिलेलं हे उत्तर खूप चर्चेत आलं असून याला लाइक करून आणि प्रतिक्रिया देत तिचे चाहते कमेंट करत तिचं हे उत्तर आवडल्याचं सांगत आहेत. तर याचबरोबर अनेकांनी तिचं हे रील आणि हा मजेशीर अंदाज आवडल्याची कमेंट केली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kranti redekar replied to troller aho tried to troll her because of her recent video rnv

First published on: 29-05-2023 at 16:12 IST
Next Story
“वाढती लोकप्रियता डोळ्यांत खुपल्यामुळे काही कारस्थान्यांनी…,” किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत