‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकरने ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. आता नव्या वर्षात त्याचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची पहिली झलक प्रसादने नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

प्रसाद खांडेकर दिग्दर्शित या नव्या चित्रपटात एक-दोन नव्हे तर तब्बल १८ मराठी कलाकार झळकणार आहेत. या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत दिग्दर्शक लिहितो, “नवीन वर्षाची सुरुवात कशी असावी तर अशी असावी…हा व्हिडीओ बनवण्याचं कारण म्हणजे, नुकतंच २०२४ हे वर्ष सुरू झालंय आणि आम्ही तुमच्या भेटीला लवकरच एक नवीन सिनेमा घेऊन येत आहोत.”

हेही वाचा : “…अन् माझा डावा हात दुखू लागला”, श्रेयस तळपदेने सांगितला हार्ट अटॅक आला त्या दिवसाचा घटनाक्रम; म्हणाला, “माझा चेहरा…”

एकाच चित्रपटात झळकणार १८ कलाकार

प्रसाद खांडेकरांच्या या नव्या चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. यामध्ये प्रसाद खांडेकरसह स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी, नम्रता संभेराव, वनिता खरात, रोहित माने, ओंकार राऊत, निखिल रत्नपारखी, प्रियदर्शनी इंदलकर, सचिन गोस्वामी, चेतना भट, प्रभाकर मोरे, ऐश्वर्या बदाडे, श्याम राजपूत, निखिल बने, प्रमोद बनसोडे, श्लोक खांडेकर हे कलाकार झळकणार आहेत.

हेही वाचा : “तुझ्या बॉयफ्रेंडचं नाव काय आहे?” चाहत्याच्या प्रश्नावर ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरुने दिलं उत्तर, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दिग्दर्शकाने चित्रपटाची घोषणा करताच नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही नेटकऱ्यांनी गौरव मोरे, समीर चौघुले यांना देखील तुमच्या चित्रपटात घ्या अशी मागणी केली आहे. या चित्रपटाचं नाव व प्रदर्शनाची तारीख याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.