दरवर्षी दिवाळी पाडवा म्हटलं की घरच्या पुरुष मंडळीत एक वेगळीच चर्चा रंगलेली असते. यात बायकोला पाडव्याला काय गिफ्ट द्यावं, याची विशेष चर्चा होते. यंदा अभिनेत्री नम्रता संभेरावला तिच्या नवऱ्याने भारी गिफ्ट दिलं आहे. त्यामुळे नम्रता सध्या चांगलीच खुश झाली आहे.

नम्रता संभेरावसाठी यंदाचा पाडवा विशेष ठरणार आहे. येत्या ८ डिसेंबरला नम्रताचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात नम्रता संभेरावचे पती योगेश संभेराव एका छोटेखानी भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “ट्रोल करुन टाईमपास करणाऱ्यांनो अकलेचे…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली “फटाके वाजवून…”

विशेष म्हणजे रील लाईफमध्येही हे कपल एकत्र झळकणार असल्याने रिअल टू रील हा प्रवास नम्रताला विशेष आनंद देणारा आहे यात शंका नाही. तसेच यानिमित्ताने तिचा पाडवाही आनंदात साजरा होणार आहे.

दरम्यान येत्या ८ डिसेंबरला प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक कृष्ण चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची आहे. तर सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी,डॉ.झारा खादर यांची आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने लेखक अभिनेता प्रसाद खांडेकर दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.

आणखी वाचा : ‘सुका सुखी’ नव्हे तर महेश मांजरेकर ‘हे’ ठेवणार होते हॉटेलचे नाव, पण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटात सयाजी शिंदे, भाऊ कदम,विशाखा सुभेदार,गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव,ओंकार भोजने राजेंद्र शिसातकर वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने,सुशील इनामदार इत्यादी कलाकार झळकणार आहेत.