छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमामधील कलाकारांचा तर मोठा चाहता वर्ग आहे. त्यातील एक कलाकार म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर. प्रियदर्शिनी सध्या ‘फुलराणी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हा पहिलाच मराठी चित्रपट. शिवाय सुबोध भावे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. प्रियदर्शिनीला मोठ्या पडद्यावर पाहून अनेक कलाकार मंडळींनी तिचं कौतुक केलं.
प्रियदर्शिनीची सर्वात जवळची मैत्रीण आणि प्रसिद्ध अभिनेत्री आरती मोरेने प्रियदर्शिनीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. आरती म्हणाली, “अण्णाची फुलराणी. वर्षभरापूर्वी तुझ्या फिल्मची प्रोसेस, किस्से, अस्वस्थता, उत्साह सगळ्या सगळ्या बद्दल आपला सवांद होत होता. त्यात तू साकारलेली फुलराणी पाहण्याचा माझा उत्साह वाढत गेला”.
काय आहे पोस्ट?
“तू किती सुंदर काम केलं आहेस. शब्दफेक आणि देहबोली पाहून तर मी अवाक् झाले. त्यामधूनच फुलराणी दरवळत गेली. तू एक भन्नाट अभिनेत्री आहेस. खूप प्रेम आणि शुभेच्छा. फुलराणीबरोबर नेहमीच अण्णा आहे”. आरतीच्या या पोस्टनंतर प्रियदर्शिनीही भावूक झाली. “आरती खूप प्रेम. धापळीमध्येही तू माझ्या पाठीही कायम उभी असतेस. माझ्याही नकळत तू माझी काळजी घेते. हे असं जाहीर कौतुकही करते. आपला संसार असाच सुरू राहुदे”. असं प्रियदर्शिनीने कमेंट करत म्हटलं आहे.
आणखी वाचा – चुलत बहिणीबरोबरच दीपिका पदुकोणच्या वडिलांनी थाटला संसार, अभिनेत्रीच्या वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…
प्रियदर्शिनी सध्या एका भाड्याच्या घरामध्ये राहते. मुंबईमध्ये ती आता स्थायिक झाली आहे. ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने तिच्या घराची गोष्ट सांगितली होती. प्रियदर्शिनी म्हणाली, “गेल्या दिड वर्षांपासून मी मुंबईमध्ये राहते. मी आणि अभिनेत्री आरती मोरे एकत्र राहतो. आधी आम्ही दोघीही वेगळ्या घरात राहत होतो. पण ते घर आमच्या घरमालकांनी काही कारणास्तव विकलं. त्यानंतर आरती व मी एक दुसरं घर भाड्याने घेतलं आहे”. आता आरतीने केलेल्या कौतुकामुळे प्रियदर्शिनी भारावून गेली आहे.