नम्रता संभेराव, समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, प्रभाकर मोरे, अरुण कदम यांच्याबरोबरच तरुण पिढीतील काही कलाकार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे नावारुपाला आले. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे शिवाली परब. गौरव, ओंकार भोजनेसह ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील काही कलाकार मंडळींना मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. शिवालीचाही नवा कोरा मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. दसऱ्याच्या मुहुर्तावर शिवालीच्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला.

आणखी वाचा – डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला अन् रणबीर कपूरने होणाऱ्या बाळासाठी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या

शिवालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे आपल्या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. ‘प्रेम प्रथा धुमशान’ असं या चित्रपटाचं नाव आहे. शिवाली चित्रपटाच्या या टीझरमध्ये मालवणी भाषा बोलताना दिसत आहे. तसेच गावाकडच्या तरुण जोडप्याची प्रेमकथा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे.

पाहा टीझर

मैत्री, प्रेम आणि त्यानंतर प्रेमाला असणारा कुटुंबाचा विरोध अशी या चित्रपटाची कथा आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये शिवाली आपल्या सहकलाकाराबरोबर रोमान्स करताना दिसत आहे. तसेच तिचा लूकही अगदी साधा आहे. शिवालीने चित्रपटाचा टीझर शेअर करताच अनेकांनी या टीझरला पसंती दर्शवली आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठमोळ्या सेलिब्रिटी जोडप्याने खरेदी केली महागडी कार, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘प्रेम प्रथा धुमशान’ टीझर आणि यामधील शिवाली परबची भूमिका पाहून तिच्या चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. अभिजीत वारंग दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २८ ऑक्टोबरला चित्रपटगृहामध्ये दाखल होईल. शिवालीच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा कितपत प्रतिसाद मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.