मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. मानसी अभिनयाबरोबर एक उत्तम डान्सर सुद्धा आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या डान्सची आणि अभिनयाची झलक ती इन्स्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून शेअर करत असते. मध्यंतरी मानसी ‘चंद्रमुखी’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आली होती. ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील मुख्य भूमिका कोणाला ऑफर करण्यात आली होती? यावरून या वादाला सुरुवात झाली होती.

हेही वाचा : Video : “खरे संस्कार पुरुषांवर…”, मराठी अभिनेत्याचा लहान मुलगा शिकतोय स्वयंपाक, नेटकरी म्हणाले, “या वयात आम्हाला…”

rangeet marathi movie
थिएटर्स नाही तर थेट OTT वर येतोय ‘हा’ मराठी सिनेमा; भुषण प्रधान, प्रार्थना बेहेरे अन् सयाजी शिंदेंच्या आहेत भूमिका
rajan vichare eknath shinde
“आनंद दिघेंनी राजन विचारेंना त्यांच्या भाषेत…”, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य; म्हणाले, “धर्मवीरच्या दुसऱ्या भागात…”
maharashtrachi hasya jatra director sachin goswami post for namrata sambherao
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक नम्रता संभेरावच्या चित्रपटाबद्दल म्हणाले, “नाच गं घुमा पाहावा तर…”
swargandharva sudhir phadke movie review by loksatta reshma raikwar
Swargandharva Sudhir Phadke Movie Review : तोच चंद्रमा नभात…
naach ga ghuma marathi movie review by reshma raikwar
Naach Ga Ghuma Movie Review : मार्मिक घुमाख्यान
Raj Thackeray Told About Film Shakti
राज ठाकरेंचं चित्रपट प्रेम आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘शक्ती’ सिनेमातील प्रसंगाचा ‘तो’ किस्सा
Imtiaz Ali on Amar Singh Chamkila caste
चित्रपटात चमकीला यांच्या जातीचा वारंवार उल्लेख, इम्तियाज अली म्हणाले, “त्यामुळेच त्यांनी आपला जीव गमावला, कारण…”
Amitabh Bachchan look in Kalki 2898 AD
‘शेवटच्या युद्धाची वेळ आली आहे!’ Kalki 2898 AD चा टीझर प्रदर्शित; ‘अश्वत्थामा’च्या दमदार भूमिकेत आहेत अमिताभ बच्चन

‘चंद्रमुखी’ चित्रपट २९ एप्रिल २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये अमृता खानविलकरने मुख्य भूमिका साकारली होती. मात्र, एका मुलाखतीत मानसीने ‘चंद्रमुखी’ चित्रपटासाठी तिला आधी विचारणा झाल्याचे सांगितले होते. यानंतर निर्माण झालेल्या वादावर अलीकडेच मानसीने भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती’ पॉडकास्टमध्ये स्पष्टीकरण दिले आहे. अभिनेत्री मानसी नाईक म्हणाली, “मी कधीच ‘चंद्रमुखी’ नव्हते. यावर स्पष्टीकरण देण्यासाठी मी स्टोरी सुद्धा शेअर केली होती. त्या कलाकारांशी याबाबत मी फोनवर सुद्धा बोलले होते.”

हेही वाचा : “वजन कमी करायचं असेल तर…”, प्रार्थना बेहेरेच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “चुकीच्या माणसाच्या प्रेमात…”

मानसी पुढे म्हणाली, “संपूर्ण गोष्ट सांगायची झाली तर, जेव्हा विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या चित्रपट बनवला जाणार अशी चर्चा होती तेव्हा मी ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम पाहत होते. त्यावेळी मी, विश्वास सर आणि सुबोध सर असे आम्ही तिघेजण बोलत असताना ‘चंद्रमुखी’चा विषय सुरु होता. त्यावेळी सुबोध भावे सर ‘चंद्रमुखी’चे दिग्दर्शन करणार होते. त्यावेळी ते म्हणाले होते, ‘माझी चंद्रमुखी तू!’ हा सगळा विषय मी एका मुलाखतीत कोणाचेही नाव न घेता सांगितला होता आणि वेगळ्याच वादाला सुरुवात झाली. त्यानंतर चित्रपटाची टीम बदलली मी आज स्पष्टचं सांगते, मला प्रसाद ओक किंवा प्लॅनेट मराठीने केव्हाच ‘चंद्रमुखी’साठी विचारणा केली नव्हती. हा विषय फार पूर्वीचा होता, तेव्हा दिग्दर्शक-निर्माते सगळेजण वेगळे होते.”

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’ फेम अभिनेत्रीची ‘ठरलं तर मग’ मालिकेत पुन्हा एन्ट्री, जुई गडकरीने शेअर केला नवीन प्रोमो

“‘चंद्रमुखी’च्या टीमने माझं नाव घेऊन यानंतर माझी प्रचंड खिल्ली उडवली त्यावेळी मला प्रचंड वाईट वाटले. ज्या व्यक्तीने ही खिल्ली उडवली त्या व्यक्तीने माझ्याबरोबर काम केले होते. त्या व्यक्तीने मला स्वत: हे सगळं विचारण्यासाठी फोन केला होता आणि मला ती फोनवरती खूप बोलली… मला फार वाईट वाटले. मी तिची खूप मोठी चाहती होते, त्या दिवशी तिने तिची चाहती गमावली… मी त्या व्यक्तीचे आता नाव घेणार नाही.” असे मानसीने सांगितले.