अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनय बेर्डे यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘मन कस्तुरी रे’ हा चित्रपट मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच एका रॅाक कॅान्सर्टद्वारे ‘नाद’ गाण्याचे जोरदार लाँचिंग झाले. सोशल मीडियावर या गाण्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच ‘मन कस्तुरी रे’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. या वेळी अभिनय बेर्डे आणि तेजस्वी प्रकाश यांनी स्कुटीवरून धमाकेदार एन्ट्री केली. या सोहळ्याला अभिनय आणि तेजस्वीसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

सर्वसामान्य घरातून आलेल्या प्रत्येक मुलाची काही स्वप्ने असतात. स्वतःचे घर, एक चांगली नोकरी, आईच् चेहऱ्यावरील हास्य. ट्रेलरमध्येही असंच स्वप्न घेऊन जगणाऱ्या सिद्धांतचं त्याच्या आईवर जीवापाड प्रेम असल्याचं दिसत आहे. कॅालेजमध्ये शिक्षण घेत, घरखर्चासाठी नोकरी करून सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या सिद्धांतच्या आयुष्यात श्रुती येते आणि त्याचे पूर्ण आयुष्यच बदलते. श्रुती आणि सिद्धांत एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. मग असे काय होते की, ज्यामुळे त्या दोघांच्या प्रेमाला नजर लागते. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भरपूर सस्पेन्स आणि ट्विस्ट पाहायला मिळत असून एकमेकांसाठीचा द्वेष, सूड भावनाही यात दिसत आहे. त्यांचे प्रेम एवढ्या टोकाला का पोहोचते? असे बरेच प्रश्न प्रेक्षकांच्या मनात घोळावत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेत माने दिग्दर्शित ‘मन कस्तुरी रे’ येत्या ४ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तेजस्वी प्रकाश, अभिनय बेर्डे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तेजस्वीचा हा पहिलाच मराठी चित्रपट असून चित्रपटाच्या संगीत प्रदर्शनाची धुरा टिप्सने सांभाळली आहे. यापूर्वी ‘सैराट’सह अनेक सुपरहिट चित्रपटांच्या निर्मितीची धुरा सांभाळलेले नितीन केण ‘मन कस्तुरी रे’चे प्रस्तुतकर्ता आहेत.