दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून आकाश ठोसरकडे पाहिले जाते. आकाश ठोसरने ‘सैराट’ या चित्रपटात ‘परश्या’ ही भूमिका साकारली होती. त्या चित्रपटामुळे तो घराघरात पोहोचला. यानंतर त्याच्या सोशल मीडियावरील चाहत्यांच्या संख्येतही वाढ झाली. मात्र नुकतंच आकाशने सोशल मीडियाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

आकाश ठोसर हा काही दिवसांपूर्वी ‘घर, बंदूक, बिरयानी’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले होते. पण त्याचा हा चित्रपट फ्लॉप ठरला. नुकतंच त्याने ‘महाराष्ट्र टाईम्स’ला एक मुलाखत दिली. यावेळी त्याला सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहण्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्याने उत्तर दिले.
आणखी वाचा : “मी तयार, फक्त तिला…” आकाश ठोसरने सांगितली लग्नासाठीची एकमेव अट

“आजच्या काळाची गरज अजूनही तू सोशल मीडियावर फारसा दिसत नाहीस. याचं काही खास कारण आहे का?” असा प्रश्न विचारला होता. त्यावर तो म्हणाला, “मला सतत तिथे असण्याची गरज वाटत नाही.”

“मला निवांत राहायला आवडतं. ट्रेकिंग आणि खाणं या दोन गोष्टींसाठी माझी सतत भ्रमंती सुरू असते. या सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट का आणि कशासाठी करायच्या, असा प्रश्न मला पडतो. मी माझे क्षण मजेत जगत आहे. मला तसंच जगायला आवडतं. चित्रपट किंवा प्रमोशननिमित्त जितकं सोशल मीडिया वापरायला हवा, तितका मी त्याचा वापर करतो”, असे आकाश ठोसरने सांगितले.

आणखी वाचा : “काही दिवसांनी असे लोक रस्त्यावर सेक्स करतील”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या पोस्टवर नेटकऱ्याची कमेंट, उत्तर देत म्हणाली “स्त्रियांबद्दल…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आकाश ठोसरचा ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटात सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटात त्याच्या लूकचे प्रचंड कौतुक केले गेले.