दिवंगत ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. शनिवारी १५ जून रोजी पुणे जिल्ह्यातील आंबी गावात राहत्या फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. गेल्या आठ महिन्यांपासून रवींद्र महाजनी हे तिथे एकटेच राहत असल्याची माहिती समोर आली. तसेच त्यांचा मृतदेह सापडण्याच्या तीन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, असं पोलिसांनी सांगितलं होतं. या संपूर्ण प्रकरणानंतर त्यांचा मुलगा व प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनीला ट्रोल करण्यात आलं. आता त्याने त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

गश्मीर महाजनीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने वडिलांच्या निधनानंतर होणाऱ्या ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच त्याने तो इतके दिवस शांत का होता, याबद्दलही सांगितले आहे.
आणखी वाचा : पुणे: प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी मृतावस्थेत सापडले

गश्मीर महाजनीची पोस्ट

“अभिनेता हा कायमच अभिनेता असतो. या प्रकरणानंतर मी, माझ्या कुटुंबाने, जवळच्या व्यक्तींनी मौन बाळगणं पसंत केलं. आम्ही शांत राहिल्याने अनेक जण द्वेष करत आहेत, शिव्याही देत आहे आणि आम्ही त्याचंही स्वागतच करतो.

आपल्यातून निघून गेलेल्या त्या आत्म्याला देव शांती देवो. ओम शांती. ते माझे वडील होते आणि माझ्या आईचे पती होते. आम्ही त्यांना तुमच्या सर्वांपेक्षा जास्त चांगलं ओळखतो. मी याबद्दल भविष्यात कधीतरी वेळ आल्यावर नक्कीच बोलेनच.”, अशी पोस्ट गश्मीर महाजनीने केली आहे.

gashmeer mahajani
गश्मीर महाजनीची पोस्ट

दरम्यान फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने रवींद्र महाजनी यांच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर पोलीस आले आणि त्यांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी त्यांचा मुलगा गश्मीर महाजनीला याबद्दल माहिती दिली आणि रवींद्र यांचा मृतदेह तळेगाव दाभाडे येथील रुग्णालयात ठेवला होता. गश्मीर तिथे आल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात आला होता.

आणखी वाचा : “‘बाईपण भारी देवा’मध्ये माझ्याबरोबर झळकलेली ती मुलगी…”, अखेर सोहम बांदेकरने दिले स्पष्टीकरण; म्हणाला, “आई माझ्यावर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रवींद्र महाजनी हे मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात देखणे अभिनेते म्हणून ओळखले जातात, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांचे असंख्य चाहते आहेत. रवींद्र यांचं चौकोनी कुटुंब आहे. त्यांच्या कुटुंबात पत्नी माधवी, मुलगा गश्मीर व मुलगी रश्मी आहेत. गश्मीर हा पत्नी, मुलगा व आईबरोबर मुंबईत राहतो. तर रवींद्र महाजनी गेल्या आठ महिन्यांपासून आंबी गावात राहत होते.