काही दिवसांपूर्वी ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची घोषणा ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी केली. या चित्रपटाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर करत सचिन पिळगांवकर यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. १९ वर्षांनंतर ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा दुसरा भाग येत असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अशा एका अभिनेत्याची वर्णी लागली आहे, ज्याचं अलीकडेच सरकार दरबारी कौतुक झालं होतं.

सचिन पिळगांवकर निर्मित, दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ५ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. या फौजेमध्ये अलीकडेच सरकार दरबारी कौतुक झालेल्या अभिनेता हरीश दुधाडे पाहायला मिळणार आहे. यासंदर्भात नुकतीच त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

हेही वाचा – प्रथमेश परबच्या होणाऱ्या बायकोने लग्नाअगोदर दिलं खास सरप्राईज, अभिनेता म्हणाला, “प्रेमात थोडं…”

अभिनेता हरीश दुधाडेने ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाच्या क्लॅपचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “या वर्षीचा पहिला सिनेमा ‘नवरा माझा नवसाचा २’. शाळेत असताना जर कुणी सांगितलं असतं की तू या सिनेमाच्या पार्ट-२ मध्ये एका मोठ्या भूमिकेत असशील , तर नक्कीच त्या माणसाला मी वेड्यात काढलं असतं. “Life is full of surprises”. ज्या सिनेमाची पारायणं केली, ज्या लोकांना बघत लहानाचा मोठा झालो, आज ती मोठी माणसं हात धरून अभिनयाचे ठेवणीतले धडे शिकवतायत, याहून आणखी काय हवं…आयुष्य सुंदर आहे…मनापासून आभार सचिन पिळगांवकर.”

हरीशची ही पोस्ट पाहून इतर कलाकार मंडळींसह चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत. आता हरीश ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये कोणती भूमिका साकारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनी हरीशला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या निवासस्थानी आमंत्रित केलं होतं. यावेळी राज्यपालांकडून अभिनेत्याच्या कामाचं कौतुक करण्यात आलं. हा अविस्मरणीय अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता.

हेही वाचा – “मला हा अजिबात आवडला नव्हता…”, खुशबू तावडे व संग्राम साळवीची ‘अशी’ झाली होती पहिली भेट; ‘देवयानी’ मालिकेच्या सेटवर नव्हे तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हरीशच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने काही मालिकांसह चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘फतेशिकस्त’, ‘फर्जंद’, ‘पावनखिंड’ या चित्रपटातील त्यांच्या कामाचं खूप कौतुक झालं होतं.