स्वत:ला कवी मनाचा नेता असे म्हणणारा अभिजीत बिचुकले हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. त्याने आतापर्यंत नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंतच्या अनेक निवडणुका लढवल्या आहेत. अभिजीत बिचुकलेला ‘बिग बॉस’ मराठी सिझन २ मधील स्पर्धक म्हणूनही ओळखले जाते. नुकतंच अभिनेता जितेंद्र जोशीने अभिजीत बिचकुलबद्दल भाष्य केले आहे.

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून जितेंद्र जोशीला ओळखले जाते. त्याच्या दमदार अभिनय कौशल्यामुळे तो कायमच चर्चेत असतो. मराठीप्रमाणेच हिंदी कलाविश्वातही त्याने अढळ स्थान निर्माण केले आहे. यामुळेच त्याचा फार मोठा चाहतावर्ग आहे. नुकतंच जितेंद्र जोशीने इन्स्टाग्रामवर आयोजित केलेल्या एका सेशनमध्ये अभिजीत बिचुकलेबद्दल वक्तव्य केलं आहे.
आणखी वाचा : “माझा आता कोणताही संबंध नाही…” ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरने दिला राजीनामा

जितेंद्र जोशीने “प्रवास करताना गप्पा मारुया” अशी पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर केली होती. त्यावर जितेंद्र जोशीला एकाने अभिजीत बिचुकलेबद्दल काय मत आहे? असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना जितेंद्र जोशीने “निवडणुकीला उभे राहिल्यावर देतो”, असे म्हटले.

jitendra joshi comment
जितेंद्र जोशीची कमेंट

आणखी वाचा : “तुझ्यामुळेच मी…”, समीर चौघुलेंसाठी प्राजक्ता माळीची खास पोस्ट

दरम्यान जितेंद्र जोशी हा काही दिवसांपूर्वी ‘गोदावरी’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटाने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये स्थान मिळवलं होतं. या चित्रपटात जितेंद्र जोशीने प्रमुख भूमिका साकारली होती.