महाराष्ट्रातील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीतील एक अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. गेल्या अनेक वर्षांपासून प्रसादने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. नाटक, मालिका किंवा चित्रपट या सर्वच माध्यमात त्याने उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. सध्या तो वडापाव या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मात्र नुकतंच प्रसादच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

प्रसाद ओक हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच प्रसादने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक गॉसिप्स करणाऱ्यांबद्दल भाष्य केले आहे. त्याने त्या व्यक्तींना टोलाही लगावला आहे.
आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ नाकारणाऱ्या निर्मात्याने केदार शिंदेना केला मेसेज, म्हणाला “माझी बस चुकली, पण…”

“तुमच्याबद्दल गॉसिप करणाऱ्या लोकांचं तुम्ही कौतुक करायला हवं. कारण त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या समस्या सोडून ते तुमच्या समस्यांबद्दल चर्चा करतात आणि ही अजिबात सोपी गोष्ट नाही”, असे प्रसाद ओकने म्हटलं आहे.

prasad oak
प्रसाद ओक पोस्ट

आणखी वाचा : “केसांचा लाल रंग, A अक्षराचे मंगळसूत्र अन्…”, ‘बाईपण भारी देवा’मधील सुचित्रा बांदेकरांच्या लूकची खासियत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान प्रसाद ओक सध्या लंडनमध्ये आहे. तो त्याच्या आगामी “वडापाव” या चित्रपटाचे शूटींग करत आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, गौरी नलावडे, अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, रसिका वेंगुर्लेकर, सिद्धार्थ साळवी, शाल्व किंजवडेकर, सविता प्रभुणे हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.