Singer Sudesh Bhosle Daughter Marriage : लोकप्रिय मराठी अभिनेता प्रतिक देशमुखने गायक सुदेश भोसले यांच्या कन्येशी लग्न केलं आहे. प्रतिक व श्रुती भोसले लग्न बंधनात अडकले आहेत. एक महिन्यापूर्वी दोघांनी साखरपुडा केला होता. आता त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. प्रतिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे.

प्रतिक देशमुख व श्रुती भोसले यांनी खासगी सोहळ्यात लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला कुटुंबीय, काही नातेवाईक व मोजकेच मित्र-मैत्रिणी हजर होते. प्रतिक व श्रुती यांचं लग्न सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी झालं. प्रतिकने लग्नाचे फोटो पोस्ट केल्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

प्रतिकने लग्नात फिकट नारंगी रंगाची शेरवानी घातली. तर श्रुती भोसलेने लाल रंगाची साडी या खास दिवशी नेसली होती. श्रुतीने कुंदनहार, कानातले व नाकात नथ असे मोजकेच दागिने घालून तिचा लूक पूर्ण केला. अगदी साध्या लूकमध्ये श्रुती खूपच सुंदर दिसतेय. 10/11/2025 अशी लग्नाची तारीख कॅप्शनमध्ये लिहून प्रतिकने फोटो पोस्ट केले आहेत.

पाहा लग्नाचे फोटो

प्रतिक व श्रुती यांचं लग्न पुण्यात झालं. त्यांच्या लग्नाला तेजश्री प्रधानने हजेरी लावली होती. तेजश्री प्रधान ही प्रतिकची मैत्रीण आहे. तेजश्रीने पोस्ट करून प्रतिक व श्रुती यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सुदेश भोसलेंच्या परफॉर्मन्सचा एक व्हिडीओही तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे.

tejashri pradhan at pratik deshmukh wedding
तेजश्री प्रधान पोस्ट

कोण आहे सुदेश भोसलेंचा जावई प्रतिक देशमुख?

Who is Pratik Deshmukh: सुदेश भोसले यांच्या कन्येशी लग्न करणारा प्रतिक देशमुख हा लोकप्रिय मराठी अभिनेता आहे. तसेच तो लेखक, निर्माता आणि इंजिनिअर आहे. प्रतिकने ‘शुभ लग्न सावधान’, ‘जजमेंट’, ‘गोल गोल गरा गरा’, ‘अजूनी’ या मालिका व सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर प्रतिकने अनेक जाहिरीतीही केल्या आहेत.