लोकप्रिय मराठी अभिनेत्री पूजा सावंत नुकतीच लग्नबंधनात अडकली. काल (२८ फेब्रुवारीला) पूजाने सिद्धेश चव्हाणबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नानंतर या जोडप्याने मुंबईत भव्य रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. लग्नानंतर पूजा व सिद्धेशवर यांच्यावर अनेक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगने या नवदाम्पत्याचे अभिनंदन केले आहे.

पुष्करने इन्स्टाग्राम स्टोरीवर पूजा व सिद्धेशचा लग्नाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले, “तुमच्या आनंदात मला सहभागी होता आलं याचा मला खूप आनंद आहे. तुम्ही दोघे कायम आनंदी राहा, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. माझ्या शुभेच्छा नेहमीच तुमच्याबरोबर आहेत.”

Before Going For Evening Gym Beetroot juice or coffee Which Drink is better For Your Health Read What Experts Said
जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय
naralachya rasatali bhendi recipe in marathi
नारळाच्या रसातली भेंडीची भाजी; भेंडीची भाजी गिळगिळीत म्हणून नाकं मुरडणारेही खातील आवडीने
man attacked wife Bhiwandi
ठाणे : जेवण गरम करून दिले नाही म्हणून एका व्यक्तीने पत्नीच्या डोक्यात पाट मारला, महिलेची प्रकृती गंभीर

पूजा व सिद्धेशचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. लग्नात पूजा व सिद्धेशने मराठमोळा लूक केला होता. पूजाने पिवळ्या रंगाची गुलाबी काठ असलेली नऊवारी नेसली होती. नाकात नथ व सोन्याचे पारंपरिक दागिने घालत तिने हा लूक पूर्ण केला होता, तर सिद्धेशने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. रिसेप्शन सोहळ्यातही दोघांच्या लूकची चांगलीच चर्चा रंगली. रिसेप्शनमध्ये पूजाने लाल रंगाची सोनेरी काठ असलेली साडी नेसली होती, तर सिद्धेशने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती व त्यावर काळ्या रंगाची भरजरी शाल घेतली होती. लग्नाच्या व रिसेप्शनच्या लूकमध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत होते.

हेही वाचा- पिवळी नऊवारी, सातफेरे अन्…; पूजा सावंतच्या लग्नाचा मराठमोळा थाट, अभिनेत्रीने शेअर केले विवाहसोहळ्यातील खास क्षण

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये पूजाने सिद्धेशबरोबर गुपचूप साखरपुडा उरकला होता. त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने लग्न ठरल्याची आनंदाची बातमी दिली होती. पूजा व सिद्धेशचं लग्न अरेंज पद्धतीने जमले आहे. दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सिद्धेश कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. तर पूजाचा नुकताच ‘मुसाफिरा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.