सौरभ गोखले याने आजवर अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सौरभने मराठी नाटकांमधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आपल्या दमदार अभिनयाबरोबरच सौरभ स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखला जातो. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय विषयांवर आपली मतं मांडत असतो. आता त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर केलेल्या एका पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे.

मागच्या तीन- चार दिवसांपासून सोशल मीडियावर “all eyes on rafah” असं लिहिलेला एक फोटो खूप व्हायरल होत आहे. अनेक सेलिब्रिटींनी हा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केल्याचं पाहायला मिळालं. अगदी बॉलीवूड सेलिब्रिटी, मराठी कलाकार व दाक्षिणात्य कलाकारांनाही हा फोटो स्टेटसला ठेवला होता. याच फोटोचा उल्लेख करत सौरभ गोखलेने स्टोरी पोस्ट केली आहे. यात त्याने या स्टोरी लावणाऱ्यांना टोला लगावला आहे. “स्वतःच्या घरी कामाला येणाऱ्या बाईंचं पोर शाळेत जाऊ शकतं की नाही हे आम्हाला माहीत नाही, पण आमचं स्टेटस मात्र ‘all eyes on rafah,'” अशी पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर केली आहे. त्याने हसण्याचे इमोजीही वापरले आहेत.

हिरवी पैठणी, नाकात नथ अन् चंद्रकोर, Cannes च्या रेड कार्पेटवर मराठी लूकमध्ये अवतरलेली ‘ती’ कोण? जगभरात होतेय चर्चा

Saurabh gokhale on All eyes on rafah
सौरभ गोखलेची पोस्ट

सौरभ गोखलेच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याने ‘योद्धा’, ‘सर्व लाइन व्यस्त आहेत’, ‘राधा ही बावरी’, ‘तलाव’, ‘परतू’ यामध्ये काम केलं आहे.

‘All Eyes On Rafah’ लिहिलेले छायाचित्र आलिया भट्टसह अनेक सेलीब्रिटींनी का शेअर केले आहे?

‘ऑल आइज ऑन राफा’ काय आहे?

‘ऑल आइज ऑन राफा’ ही एक मोहीम आहे. या मोहिमेने जगभरातील लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. इस्रायली सैनिकांकडून गाझा शहरावर करण्यात आलेल्या हल्ल्याकडे लक्ष वेधणारी ही मोहीम आहे. गाझावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मारले गेले आहेत. मानवी हक्क कार्यकर्ते, तसेच संवेदनशील लोकांकडून या हल्ल्याच्या विरोधात आवाज उठवण्यात येऊ लागला. गाझा पट्टीमध्ये सुरू असलेल्या हाहाकाराकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधणे आणि हा नरसंहार तातडीने बंद व्हावा, यासाठीची संवेदनशीलता वाढविणे हा या मोहिमेचा हेतू आहे. पॅलेस्टिनी नागरिकांना शांतता आणि न्याय मिळावा यासाठी या मोहिमेद्वारे आवाज उठविला जात आहे.

“गोळीबाराचा आदेश कोणी दिला? हे देशाला समजलंच पाहिजे”, मनोज जरांगे पाटलांच्या हस्ते ‘संघर्षयोद्धा’चा ट्रेलर प्रदर्शित

बॉलीवूड सेलिब्रिटींनी शेअर केला फोटो

आलिया भट्ट, माधुरी दीक्षित, वरुण धवन, नुशरत भरुचा, मलायका अरोरा, अर्जून कपूर, समंथा रुथ प्रभू, तृप्ती दिमरी अशा अनेक भारतीय सेलीब्रिटींनी ‘All Eyes on Rafah’चा हा फोटो शेअर केला होता. माधुरी दीक्षितने ट्रोलिंगनंतर ही पोस्ट डिलीट केली होती. अनेक खेळाडूंनीही हा फोटो शेअर केला होता.