scorecardresearch

Premium

“तेजस्विनी पंडित स्वाभिमानी, सोनाली कुलकर्णी उत्तम अभिनेत्री, तर सई ताम्हणकर…”; सिद्धार्थ जाधवचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

लवकरच तो एका चित्रपटात झळकणार आहे.

siddharth jadhav sai tamhankar
सिद्धार्थ जाधव सई ताम्हणकर

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखले जाते. तो मराठी चित्रपटसृष्टीत टॉप १० अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या तो आता होऊ दे धिंगाणा २ या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. त्याबरोबरच लवकरच तो एका चित्रपटात झळकणार आहे.

सिद्धार्थ जाधवने नुकतंच लोकमत फिल्मीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रींबद्दल विचारण्यात आले. यावेळी त्याला अभिनेत्री सई ताम्हणकरबद्दल रॅपिड फायरमध्ये विचारण्यात आले. त्यावर त्याने मजेशीर शब्दात उत्तर दिले.
आणखी वाचा : “तू स्वत:वर ती वेळ…”, अशोक सराफ यांनी निवेदिता यांना दिला ‘हा’ कानमंत्र

film director Kumar Shahani passed away
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कुमार शाहनी यांचे निधन; कलात्मक हिंदी चित्रपटसृष्टीचा महत्त्वाचा दुवा निखळला
snehal sidham in Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya
वनिता खरात, प्रियदर्शनीनंतर शाहीद कपूरच्या चित्रपटात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी! म्हणाली, “कळवायला उशीर…”
anand-mahindra-ips-manoj-sharma
आनंद महिंद्रा यांनी घेतली आयपीएस मनोज शर्मा व आयआरएस श्रद्धा जोशी या जोडप्याची भेट; म्हणाले, “हे खरे…”
lal-salaam-trailer
Lal Salaam Trailer: धर्म, राजकारण व खेळाचं अनोखं मिश्रण असलेला रजनीकांत यांच्या बहुचर्चित ‘लाल सलाम’चा ट्रेलर प्रदर्शित

यावेळी त्याला तेजस्विनी पंडितबद्दल विचारले असता त्याने ‘फोकस आणि स्वाभिमानी’ असे म्हटले. त्यानंतर त्याने अमृता खानविलकरला ‘एनर्जी’ असे म्हटले. तसेच ‘काय करायचं तुझ्या एनर्जीचं’, असेही त्याने सांगितले.

यानंतर त्याला प्रिया बापटबद्दल विचारले असता त्याने तो ‘गोड, क्यूट अंम्रे’ असे म्हणाला. याबरोबरच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला ‘उत्तम अभिनेत्री’ असे त्याने म्हटले. यानंतर त्याला सई ताम्हणकरबद्दल विचारणा केली असता त्याने ‘बेस्ट आणि वाघीण’ असा उल्लेख केला.

दरम्यान सिद्धार्थ जाधव आणि सई ताम्हणकर हे दोघेही एकमेकांची चांगले मित्र आहेत. त्या दोघांनी ‘सुंबरान’, ‘सिटी ऑफ गोल्ड’, ‘टाईम प्लीझ’ आणि ‘धुराळा’ या चार चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे. या दोघांच्या केमिस्ट्रीचे अनेक चाहते आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actor siddharth jadhav talk about sai tamhankar sonalee kulkarni tejaswini pandit nrp

First published on: 26-10-2023 at 15:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×