मराठीतील सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले जाते. उत्तम अभिनय, कमालीचा डान्स आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री म्हणून तिची खास ओळख आहे. अमृताने मराठीसह बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतंच तिने तिच्या आणि पती हिमांशूच्या नात्याबद्दल भाष्य केले.

अमृताने नुकतंच एका मराठी रेडिओ चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला नाती आणि आयुष्याच्या प्रवासाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी तिने तिचा पती हिमांशू मल्होत्राबद्दलही वक्तव्य केले.
आणखी वाचा : “मी गरोदर असूनही…” चाहत्याच्या ‘त्या’ कमेंटवर सई लोकूरचे सडेतोड उत्तर

“मी अनेकदा काही बोलले नाही, तरी ते माझ्या चेहऱ्यावर येतं. माझ्या डोळ्यात दिसतं. तुम्ही जेव्हा कधीही एखादी वाट निवडता, मग ती वाट शांत राहण्याची असो किंवा आपलं मत मांडण्याची असो. तेव्हा मग तुम्हाला चांगल्या गोष्टीतूनही जावं लागतं आणि वाईट गोष्टींचाही सामना करावा लागतो.

कधीतरी लोक तुमचा फायदा घेतात किंवा काही लोक साथही देतात. त्यामुळे या प्रवासात चढ आणि उतार येत असतात. मी कधीच कोणापासून काही लपवलेले नाही. मी माझ्या आईपासून किंवा पती हिंमाशूपासून काहीही लपवलेलं नाही. त्यामुळे माझ्या आयुष्यात जे काही घडलं, ते या दोन माझ्या अत्यंत जवळच्या माणसांना माहिती आहे”, असे अमृता खानविलकर म्हणाली.

“पण मला एक गोष्ट समजली आहे की आयुष्यात आदर हा खूप महत्त्वाचा आहे. तु्म्ही समोरच्या व्यक्तीचा आदर करणं आणि समोरच्या व्यक्तीने तुमचा आदर करणं हे खूप गरजेचे आहे. हे एखाद्या रिलेशनशिपमध्ये असो किंवा एखाद्या कामाच्या ठिकाणी असो… जर तुम्हाला आदर मिळत नसेल तर तुम्ही ते काम अजिबात करु नका.

माझ्या आणि हिमांशूच्या नात्यातही हे असंच आहे. प्रेम वैगरे आता खूप मागे राहून गेलं आहे. तुमच्याबद्दलचा एक ठराविक आदर जर नसेल तर मग तुम्ही खचता. तुमच्यासाठी ते रिलेशन खूप कंटाळवाणं होतं. त्यामुळे नात्यात आदर मिळणं महत्त्वाचं असतं”, असेही अमृता खानविलकरने म्हटले.

आणखी वाचा : “बाबांनी डोळे फिरवले, तोंडातून फेस येत होता अन्…” प्रार्थना बेहरेने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग, म्हणाली “त्यांची नस…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमृता आणि हिमांशूने २०१५ मध्ये लग्न केले. तर या दोघांची पहिली भेट ही २००४ मध्ये झाली होती. अमृता आणि हिमांशू नेहमी त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. हिमांशू हा कायमच अमृताला पाठिंबा देताना दिसतो. तो तिच्या अनेक चित्रपटांबद्दल पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया देताना पाहायला मिळतो.