एका मराठी अभिनेत्रीच्या हॉट व ग्लॅमरस फोटोंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. गळ्यात फक्त एक नेकलेस असलेल्या तिच्या या फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. इतर फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.

सध्या साउथचे सिनेमे जगभर गाजताना दिसत आहेत. यामध्ये आता एक मराठमोळ्या चेहरा देखील सध्या सोशल मिडियावर आपल्या हॉट, बोल्ड लूकमूळे चर्चेत आला आहे. दाक्षिणात्य इंडस्ट्रीत काम करून नाव कमावणारी मराठमोळी अभिनेत्री अश्विनी चवरे (Ashwini Chavare) सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अश्विनी चर्चेत असण्यामागचं कारण तिचे ग्लॅमरस फोटो आहेत.

हेही वाचा – “संजय कपूरने माधुरी दीक्षितला झापड मारल्यावर…”, दिग्दर्शकाने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाला, “मला वाटलं माझं करिअर संपलं”

पाहा फोटो –

ashvini chavre
अश्विनी चवरेचा बोल्ड फोटो

नवीन वर्षाच्या सुरुवातीला अश्विनीने एका हॉट आणि सेन्सेशनल फोटोशूटमधून स्वतःचा असा एक वेगळा लूक प्रेक्षकांसमोर सादर केला आहे, जो यापूर्वी कधीही पाहिला गेला नव्हता. नवीन वर्षात अश्विनीचा हा नवा लूक चाहत्यांसाठी एक सरप्राईज ठरला आहे. तिच्या या बोल्ड लूकने तिचे चाहते थक्क झाले आहेत. सोशल मीडियावर तिच्या या फोटोशूटचे फोटो व्हायरल होत आहेत. तिच्या या फोटोंवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा – अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अश्विनी चवरेने या फोटोशूटसाठी एक आधुनिक आणि आकर्षक स्टाइल निवडली आहे. फोटोंमध्ये अश्विनीचा आत्मविश्वास लक्ष वेधून घेत आहे. हे ग्लॅमरस फोटो तिच्या व्यक्तिमत्वाचा नवीन पैलू दाखवतात. अश्विनीच्या या बोल्ड फोटोशूटमुळे तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अश्विनी या वर्षात मराठी आणि दक्षिणेतील दमदार कोलॅबरेशन असलेल्या ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ आणि ‘जिलबी’ या सिनेमांत झळकणार आहे. हे दोन्ही सिनेमे याच वर्षी प्रदर्शित होणार आहेत.