आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांमुळे ती घराघरात पोहोचली. मानसी नाईकने अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर नवीन घर खरेदी केली आहे. नुकतंच तिने याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या दिवशी कोणत्याही कार्याची सुरुवात केल्यास ते कार्य सुफल संपूर्ण होते असे म्हटले जाते. याच मुहूर्तावर मानसी नाईकने नवीन घर खरेदी केले आहे. या नव्या घरात पूजा करताना आणि गृहप्रवेशाचा एक व्हिडीओ मानसीने शेअर केला आहे.
आणखी वाचा : “माझी कोणीही क्रश नाही, पण कोकण हार्टेड गर्लचा…”, ओंकार भोजनेचा खुलासा

मानसी नाईकची पोस्ट

“प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं स्वतःचं एक तरी घर असावं
जेथे आपल्या लोकांनी आनंदाने हसावं
दमलेल्या जीवासाठी ते विसाव्याचं स्थान असावं
या रखरखीच्या जगण्यात वावरतांना
उमेद देणार डोळ्यासमोर तुम्हाला तुमचं घर दिसावं
माझी ऊर्जा स्थान बनले, माझे नवीन घर
मांगल्याचे दुसरे रूप असते एक घर
संस्कारांची शिदोरी असते एक घर
माझे घर

अक्षय राहो मानवता
क्षय हो ईर्ष्येचा
जिंकू दे प्रेमाला आणि
हरू दे पराभवाला
सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा”, असे कॅप्शन मानसीने या व्हिडीओला दिले आहे.

आणखी वाचा : “तुमचे आशीर्वाद…” मानसी नाईक लवकरच करणार नवी सुरुवात, पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मानसी नाईकने शेअर केलेल्या व्हिडीओत तिचे कुटुंबिय पाहायला मिळत आहेत. यात ती घराबाहेर कलशाची पूजा करताना दिसत आहे. तसेच ती नव्या घराच्या दरवाजावर ‘श्री’ असे लिहितानाही दिसत आहे. यानंतर ती पूजा करताना दिसत आहे. मानसीने तिच्या नव्या घराबद्दलची गुडन्यूज दिल्यानंतर अनेक कलाकार तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत.