‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. ती सोशल मीडियावर सतत रील व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच एका रिल व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमुळे ती चर्चेत आली आहे.

मानसी नाईक ही गेल्या काही महिन्यांपासून तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने तिचा पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले. त्यातच आता मानसीने रिलेशनशिप आणि ते तुटण्याचे कारण सांगितले आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत यावर भाष्य केले आहे.
आणखी वाचा : “खरंतर ऐन उन्हाळ्यात चित्रपट प्रदर्शित करायला हवा होता…”, संजय मोने यांची पोस्ट; म्हणाले “नाव ‘बाईपण भारी देवा’ असलं तरी…”

यात ती बॉलिवूडमधील एका जुन्या गाण्यावर नाचताना दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना ती रिलेशनशिपबद्दल बोलली आहे. “कोणत्याही नात्यात विश्वास असणं फार गरजेचे असते. पण जेव्हा त्याच नात्यात तुम्ही गुप्तहेरासारखे वागू लागता, तेव्हा ते नातं संपवण्याची वेळ जवळ आली आहे, हे समजून जा”, असे तिने यात म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाबद्दल केदार शिंदेंचा मोठा खुलासा, म्हणाले “याचा शेवट…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदिप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते. पण त्यानंतर त्या दोघांच्याही नात्यात दुरावा आला.