अभिनेत्री मानसी नाईकने पती प्रदीप खरेराबरोबर घटस्फोट घेत असल्याचं उघड केलं. मानसीच्या या निर्णयानंतर तिच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. वैवाहिक आयुष्यामध्ये सुखी नसल्याचंही मानसीने स्पष्टपणे सागितलं. घटस्फोटाची प्रक्रिया सध्या सुरू आहे असं मानसीने एका मुलाखतीत म्हटलं होतं. मात्र तिचा नवरा प्रदीपने घटस्फोटाबाबत अजूनही मौन कायम पाळलं आहे. प्रदीप एक उत्तम मॉडेल व बॉक्सर आहे.

आणखी वाचा – रिलेशनशिप, लग्न अन् आता घटस्फोट…; मानसी नाईकच्या बॉक्सर नवऱ्याबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का?

प्रदीप सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. फोटोशूट असो वा जिममधील एखादा व्हिडीओ तो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतो. काही महिन्यांपूर्वी तर त्याने चक्क न्यूड फोटो शूट केलं होतं. त्याच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती.

प्रदीपने शेअर केलेले न्यूड फोटोशूट पाहून नेटकरीही हैराण झाले. त्याने फक्त अंतर्वस्त्र परिधान करत हे फोटोशूट केलं. तर काही फोटोंमध्ये फक्त टॉवेल गुंडाळून विविध पोझ दिल्या. या फोटोंमध्ये प्रदीपचा हॉट लूक पाहायला मिळाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या फोटोंमध्ये प्रदीपची शरीरयष्टीही आकर्षक दिसत होती. मुळातच तो एक बॉक्सर आहे. त्यामुळे प्रदीप त्याच्या शरीरयष्टीवर अधिकाधिक मेहनत घेताना दिसतो. प्रदीपच्या न्यूड फोटोशूट व्यतिरिक्त त्याचे बरेच शर्टलेस फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.