‘कलरफुल’ अभिनेत्री अशी ओळख असणारी पूजा सावंत हिच २८ फेब्रुवारीला लग्न झालं. सिद्धेश चव्हाण याच्याशी पूजाने लग्नगाठ बांधली. मोठ्या थाटामाटात पूजा व सिद्धेशचा लग्नसोहळा पार पडला. साखरपुडा, व्याही जेवण, संगीत, मेहंदी, हळद आणि सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा पूजा सावंतचा पाहायला मिळाला. अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ अजूनही चर्चेत आहेत. अशातच आता पूजा नवरा सिद्धेशबरोबर फिरायला जाणार असल्याचं समोर आलं आहे.

२८ नोव्हेंबर २०२३ रोजी अभिनेत्री पूजा सावंतने बीचवरील फोटो शेअर करत सिद्धेशबरोबर असलेलं नातं जाहीर केलं होतं. त्यानंतर १६ फेब्रुवारी २०२४ रोजी दोघांचा साखरपुडा झाला. तेव्हापासून पूजाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली. अखेर २८ फेब्रुवारीला ती लग्नबंधनात अडकली. आता पूजा फिरायला जाण्यासाठी तयार झाली आहे. यासंबंधित फोटो तिने इन्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

हेही वाचा – लग्नाच्या सात दिवसांनी तितीक्षा तावडे परतली कामावर, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या सेटवर ‘असं’ झालं स्वागत

पूजाने काही तासांपूर्वी इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीच्या हातात तिच्या आईच्या हातचा चहा आणि मालवणी वडे पाहायला मिळत आहेत. या फोटोवर तिने लिहिलं आहे, “उड्डाण घेण्यापूर्वी आईच्या हातच्या पदार्थांचा आस्वाद घेतला. थँक्यू आई.”

हेही वाचा – Video: “महागडे गिफ्ट्स, चॉकलेट्स अन्…”, प्रथमेश परबने ‘असा’ साजरा केला बायकोचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पूजाचा नवरा अभिनेता नसून ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीत कामाला आहे. त्यामुळे आता ती परदेशात निघाली की दुसरीकडे कुठे? हे येत्या काळात स्पष्ट होईल. गेल्या महिन्यात ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये पूजा परदेशात स्थायिक होण्याविषयी बोलली होती, “काही वर्षांसाठी सिद्धेश ऑस्ट्रेलियात आहे. म्हणून मी काही वर्ष येऊन जाऊन करेन.”