मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहेत. ती लवकरच एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. ‘तीन अडकून सीताराम’ असे या चित्रपटाचे नाव आहे. यानिमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे.
प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर कायमच चर्चेत आहे. नुकतंच प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने तिच्या आगामी चित्रपटाची पहिली झलक दाखवली आहे. यात प्राजक्ता ही जेलमध्ये असल्याचे दाखवण्यात आले आहे. तिच्यावर प्रेमात पडल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
आणखी वाचा : मोठा स्विमिंगपूल, बेडरुमबाहेर निसर्गाचा नजारा अन्…; प्राजक्ता माळीच्या अलिशान फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का?
मी रेवा! प्रेमात पडले आणि कळलंच नाही की इतकी कशी अडकले. कुणाच्या? इश्श! कळेलच तुम्हाला २९ सप्टेंबरला. #तीनअडकूनसीताराम फक्त चित्रपटगृहांत, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
दरम्यान प्राजक्ता माळी ही लवकरच ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात प्राजक्ताबरोबरच वैभव तत्त्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, आनंद इंगळे हे कलाकाराही दिसणार आहेत. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन वैद्य या चित्रपटाचे निर्माते आहेत. “दुनिया गेली तेल लावत”, अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. येत्या २९ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.