Marathi Actress Rajeshwari Kharat Baptised Photo Viral : ‘फँड्री’ या मराठी चित्रपटात ‘शालू’ची भूमिका करून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने धर्म बदलण्यासंदर्भात पोस्ट केली आहे. राजेश्वरीने ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला आहे. तिच्या या दोन पोस्ट पाहिल्यानंतर चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत.

राजेश्वरीने काही तासांच्या अंतराने इन्स्टाग्रामवर दोन पोस्ट केल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये तिने ४ फोटो शेअर केले आहेत. दोन फोटोत ती काही जणांबरोबर नदीच्या काठावर उभी असलेली दिसतेय. तर दोन फोटो घरात काढलेले आहेत. घरातील काही सदस्य या फोटोंमध्ये दिसत आहेत.

राजेश्वरीने कॅप्शनमध्ये लिहिलं, ” I know the plans I have for you, says the Lord … ” या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने हॅशटॅग दिले आहेत. त्यात #baptism #newbeginnings #life #love #rajeshwarikharat #foryou #easter या उल्लेख आहे. राजेश्वरीने इस्टरला ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्याचं यावरून दिसतंय.

पाहा पोस्ट

दुसऱ्या फोटोत राजेश्वरी पाण्यात हात जोडून, डोळे बंद करून उभी आहे. एका व्यक्तीचा हात तिच्या डोक्यावर दिसतोय, तर एका व्यक्तीचा हात तिच्या खांद्यावर दिसत आहे. हा फोटो पोस्ट करताना Baptised हा शब्द वापरला आहे. याचा अर्थ ख्रिश्चन धर्मात प्रवेश असा होतो.

पाहा पोस्ट

राजेश्वरीच्या पोस्टवरून तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे असं दिसतंय. तिच्या या पोस्टवर नेटकरी विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. ‘काळ्या चिमणीची राख टाकाय लागत्या’, ‘अनपेक्षित, सर्वांना खूप नाराज केलंस’, ‘खाल्लीस माती?’ ‘यात सोमनाथ दिसला नाही दुःख वाटलं’, ‘जब्याला कुठे सोडलं बाई, त्याच्याबरोबर फिरत जा,’ ‘हिला अनफॉलो करा,’ ‘हिने धर्म बदलला म्हणे खरं आहे का,’ ‘अशिक्षित असल्यावर असंच होतं,’ अशा कमेंट्स राजेश्वरीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
netizens reaction on Rajeshwari Kharat Baptised photo
राजेश्वरी खरातच्या पोस्टवरील कमेंट्स (सौजन्य – इन्स्टाग्राम)

दरम्यान, राजेश्वरीने काही महिन्यांपूर्वी तिचा ‘फँड्री’मधील को-स्टार सोमनाथ अवघाडेबरोबर फोटो शेअर केला होता. एक फोटो हळदीचा होता, तर दुसरा फोटो लग्नाचा होता. फोटोत ते दोघेही मुंडावळ्या बांधून दिसत होते. नेहमी फोटोशूटमधील फोटो शेअर करणाऱ्या राजेश्वरीने आता पोस्ट करून ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याची माहिती दिली आहे.