मराठीतील बहुप्रतीक्षित ‘झिम्मा २’ चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा पहिला भाग खूप मोठ्या प्रमाणात गाजला होता. झिम्मा हा करोना काळानंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, ‘झिम्मा २’मध्ये दोन लोकप्रिय अभिनेत्रींची एंट्री झाली आहे

हेही वाचा- “… त्यानंतर १० वर्ष आम्ही एकमेकांशी बोललो नाही”; सिद्धार्थ जाधवने सांगितला सोनाली कुलकर्णीबरोबरचा ‘त्या’ वादाचा किस्सा

‘झिम्मा’ चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले यांच्या मुख्य भूमिका होत्या. आता ‘झिम्मा २’मध्ये या अभिनेत्रींबरोबर आणखी दोन नव्या अभिनेत्रींची एंट्री झाली आहे. ‘झिम्मा २’मध्ये रिंकू राजगुरू व शिवानी सुर्वेही झळकणार आहे.

अभिनेत्री सायली संजीवने या चित्रपटाने नवीन पोस्टर आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये सायली संजवी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, रिंकू राजगुरू, निर्मिती सावंत, सिद्धार्थ चांदेकर, सुहास जोशी व शिवानी सुर्वे दिसत आहेत. सायलीने हा फोटो शेअर करीत लिहिले आहे- “तीच मज्जा आहे दुसऱ्याही डावात. आईच्या नाही… आज्जीच्याही गावात! तुमचे आमचे REUNION बरोबर एक महिन्यात; २४ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात.”

हेही वाचा- “तुम्हाला इथे येऊन आगाऊपणा…”, नेटकऱ्याच्या ‘त्या’ टोमण्याला अभिनय बेर्डेचे सडेतोड उत्तर, म्हणाला…

‘झिम्मा २’ चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सायली संजीव, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, अनंत जोग, चैत्राली गुप्ते, सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आनंद एल. राय व क्षिती जोग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.