मराठीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकरचं नाव आवर्जुन घेतलं जातं. मराठीसह बॉलिवूडमध्येही तिने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘दुनियादारी’, ‘क्लासमेट’, ‘तू हि रे’ या गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये सईने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. नुकतंच सईने तिच्या आईने लावलेल्या सवयीबद्दल सांगितले.

सई ताम्हणकरने नुकतंच कर्ली टेल्स या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत सई ताम्हणकरला तिचे बालपण आणि भाजी खाण्याची सवय याबद्दल विचारणा करण्यात आली. यावेळी तिने तिच्या आठवणींना उजाळा दिला.
आणखी वाचा : “ढोल वादन संपल्यानंतर…”, सिद्धार्थ जाधव आणि तेजस्विनी पंडितची झाली ‘अशी’ अवस्था, फोटो समोर

“मी लहान असताना खूप लाडात वाढलेली मुलगी होते. पण तितकाच मी मारही खाल्ला आहे. माझे वडील मर्चंट नेव्हीमध्ये होते. त्यामुळे मी आणि माझी आईच घरी असायचो. माझ्या घरी पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा होता. माझ्या वडिलांनी पॉप कल्चर, मायकल जॅक्सन, मेडोना यांसारख्या गोष्टींशी माझी ओळख करुन दिली”, असे सईने सांगितले.

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला माझ्या घरातच आईने सर्व खाण्याची सवय लावली. मला हे आवडत नाही, ते आवडत नाही, असं माझ्या घरी बिलकुल चालायचं नाही. कारण जेव्हा मी माझ्या घरी आईला तू आज ही भाजी का दिलीस, मला ती आवडत नाही, अशी तक्रार करायचे. तेव्हा माझ्या घरात दुसऱ्या दिवशी तीच भाजी केली जायची आणि मला तीच खायला लागायची.

आणखी वाचा : इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट केल्यानंतर रिंकू राजगुरु पोहोचली केदारनाथला, कॅप्शन चर्चेत

“पण माझ्या आईमुळे मला या विशिष्ट पद्धतीने जगायची सवय लागली. यामुळे मी जगात कुठेही गेली तरी मी उपाशी राहणार नाही. मला कारल्याची भाजी प्रचंड आवडते”, असा किस्सा सई ताम्हणकरने सांगितला.