‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला आहे. या चित्रपटाने अनेक रेकॉर्डही ब्रेक केले आहेत. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. नुकतंच सुकन्या मोने यांच्या एका कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

बाईपण भारी देवा या चित्रपटात सुकन्या मोने यांनी साधना हे पात्र साकारलं आहे. या पात्राचे सर्वत्र कौतुक होत आहे. नुकतंच अभिनेत्री अमृता खानविलकरने सुकन्या मोनेंना खास भेटवस्तू पाठवली आहे. त्यासाठी सुकन्या मोनेंनी पोस्ट शेअर करत तिचे आभार मानले.
आणखी वाचा : “तिची मतं, कृती मला पटत नाही, पण…”, देवेंद्र फडणवीसांनी अमृता फडणवीसांबद्दल मांडलं स्पष्ट मत, म्हणाले “महिलांनी इतकी…”

सुकन्या मोनेंच्या या पोस्टखाली एका महिलेने कमेंट केली आहे. “तुम्ही ब्राह्मण असून सुद्धा मांसाहारी पदार्थ खाता, मला वाईट वाटलं ऐकून”, अशी कमेंट एका महिला चाहतीने केली आहे. त्यावर सुकन्या मोनेंनी प्रतिक्रिया देत सडेतोड उत्तर दिले आहे.

आणखी वाचा : “खरंतर ऐन उन्हाळ्यात चित्रपट प्रदर्शित करायला हवा होता…”, संजय मोने यांची पोस्ट; म्हणाले “नाव ‘बाईपण भारी देवा’ असलं तरी…”

“सॉरी कोणी सांगितले मी मांसाहारी खाते?आणि कोणी काय खाव हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे नाही का? आणि ते चांगल की वाईट हेसुध्दा ज्याचे त्याने ठरवायचे असते.मी शाकाहारी आहे”, असे सुकन्या मोनेंनी म्हटले आहे.

sukanya mone comment
सुकन्या मोनेंची प्रतिक्रिया

आणखी वाचा : प्रत्येकीला वेगळा रंग, ब्लाऊजवर विशिष्ट संदेश अन्…; ‘बाईपण भारी देवा’मधील ‘मंगळागौर’ गाण्यासाठी वापरलेल्या साड्यांची ‘ही’ आहे खासियत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सुकन्या मोने यांच्या या कमेंटवर अनेकजण त्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. सध्या सुकन्या मोने या बाईपण भारी देवा या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाने १७ दिवसांतच ५० कोटींचा टप्पा ओलांडला होता. आतापर्यंत या चित्रपटाने ५७ कोटींहून अधिकची कमाई केली होती.