मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नृत्यांगना म्हणून फुलवा खामकरला ओळखले जाते. फुलवाने आत्तापर्यंत अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शिका म्हणून काम केले आहे. तसेच तिने टेलिव्हिजवरील अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. सोशल मीडियावर फुलवा मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान फुलवाच्या नव्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नुकतीच फुलवा पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमात तिची भेट प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्याबरोबर झाली. जॅकी श्रॉफ यांच्या भेटीमुळे फुलवाला खूपच आनंदी झाल्याचे पहायला मिळाले. फुलवाने या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले “आधी अनेक वेळा भेटायची संधी असूनही पुढे जाऊन जॅकी श्रॉफ यांच्याशी मी कधीच बोलले नव्हते. फक्त त्यांना बघितलं होतं. मात्र, यावेळी पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच पुढे होऊन बोलले.”

Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
jaya bachchan opens up on relationship with amitabh bachchan
जया बच्चन यांनी बिग बी यांच्याबरोबरच्या नात्याबाबत केला खुलासा, नातीच्या शोमध्ये म्हणाल्या, “माझे पती…”
Sharmistha Mukharjee and Arvind Kejriwal arrest
“कर्माची फळं…”, प्रणव मुखर्जींच्या मुलीचा केजरीवालांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, “अण्णा हजारे गँग…”
फुलवा खामकरची पोस्ट

फुलवाने पुढे लिहिले, “आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा आदर करणे किती महत्त्वाचे आहे हे मला प्रकर्षाने जाणवले. मी अनेक वर्षांपासून तुमचे चित्रपट पाहत आले आहे. मी तुमची चाहती आहे. चाहत्यांबरोबर तुमचे वागणे बघून मी तुमची अजून मोठी चाहती बनली आहे.” फुलवाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टमध्ये कमेंट केल्या आहेत.

हेही वाचा- दोन वाट्या, काळे मणी अन्… पारंपरिक पण हटके आहे पूजा सावंतचं मंगळसूत्र; डिझाइनने वेधलं लक्ष

फुलवाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास आत्तापर्यंत तिने अनेक बॉलीवूड आणि मराठी चित्रपटातील नृत्यांचे दिग्दर्शन केले आहे. ‘हॅपी न्यू इयर’, ‘जुली २’, ‘नटरंग’, ‘कुणी मुलगी देता का मुलगी’ आणि ‘मितवा’ चित्रपटात तिने नृत्यदिग्दर्शिका म्हणून काम पाहिले. नृत्य क्षेत्रातील योगदानासाठी तिला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.