‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’ व ‘बॉईज ३’ हे तीन चित्रपट सुपरहिट ठरले. या तिन्ही चित्रपटानंतर आता लवकरच ‘बॉईज ४’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातही कॉलेजवयीन मुलांची धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. त्यानंतर आता या चित्रपटातील एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
‘बॅाईज ४’मधील अवधूत गुप्तेंसह सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडने गायलेल्या रॅप साँगला संगीतप्रेमींनी प्रचंड प्रतिसाद दिला. या गाण्याला भरभरून प्रेम मिळत असताना आता ‘बॅाईज ४’मधील ‘गाव सुटंना’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. आपल्या मुळाकडे घेऊन जाणारे हे भावनिक गाणे आहे.
आणखी वाचा : “माझा आगाऊपणा…”, सोहम बांदेकरने आईला दिल्या खास शुभेच्छा, म्हणाला “आम्हाला तुझे फोटो…”
जगाच्या पाठीवर माणूस कुठेही गेला, तरी त्याची नाळ आपल्या गावाशी, जन्मभूमीशी कायम जोडलेली असते. त्यांचे ते प्रेम कधीच कमी होत नाही. या गाण्यातून आपल्या गावाचे सुंदर वर्णन करण्यात आले आहे. आपल्या गावातील आठवणी कशाप्रकारे मनात जपल्या आहेत, हे देखील यातून दिसत आहे. परदेशात राहणाऱ्यांना आपल्या गावाची ओढ लावणारे हे गाणे आहे.
या गाण्याला गणेश शिंदे यांनी शब्दबद्ध केले आहे. या सुरेख गाण्याला अवधूत गुप्ते यांचे संगीत लाभले आहे. तर हे गाणे प्रतिक लाड आणि रितुजा शिंदे यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. तर हे गाणे पद्मनाभ गायकवाड यांनी गायले आहे.
आणखी वाचा : “माझ्यावर स्वत:च्या मुलीप्रमाणे…” जिनिलीया देशमुखची सासूबाईंसाठी खास पोस्ट, म्हणाली “माझी मराठी…”
सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत. तर विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे. येत्या २० ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.