दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतंच केदार शिंदे यांनी अभिनेते आदेश बांदेकर यांच्या पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे.
केदार शिंदे यांनी सुचित्रा बांदेकर यांच्याबरोबर एक खास फोटो शेअर केला आहे. याबरोबर त्यांनी सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर यांच्याबरोबर असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याबद्दलही सांगितले आहे. त्याबद्दल त्यांनी एक पोस्ट शेअर केली केली आहे.
आणखी वाचा : “जेवढा पैसा-प्रसिद्धी जास्त…” शिवाली परबच्या नव्या लूकवर चाहते नाराज, म्हणाले “तू साधीच…”
केदार शिंदे यांची पोस्ट
“माझी आणि सुचित्रा बांदेकर हीच्या मैत्रीपेक्षा, ती आणि माझी बायको बेला हीचीच जास्त घट्ट मैत्री आहे. मी सुचित्रा ला पाहीलं ते अंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत. ती असली की, हमखास अभिनयाचं पारितोषिक तीलाच! पुढे तीने खुप व्यावसायिक नाटकातून सिरीयल सिनेमा मधून काम केलं. आमचा घरोबा झाला ते आम्ही पवई मध्ये एकाच इमारतींत राहायला आलो तेव्हापासून. ती माझ्यासाठी स्वामींचा दूत आहे. आजही तीने एखादी गोष्ट मला सांगितली की, मी ती कधीच हलक्यात घेत नाही.
बाईपणभारीदेवा सिनेमासाठी आम्ही पहिल्यांदा एकत्र काम करतोय. तीच्या अभिनयाचा चाहता म्हणून मी तीला सतत, तू काम का करत नाहीस? हा प्रश्न विचारतो. ती काही फार मला सिरीयसली घेत नाही. पण हा तीचा सहज स्वभाव तीच्या अभिनयाचा प्लस पॉइंट आहे. मी स्वामींचे नेहमी आभार मानतो की, आदेश आणि सुचित्रा आमच्या आयुष्यात पाठवलेत. आणि तीला माझ्या सोबत या सिनेमात काम करण्याची सुबुद्धी दिलीत.. स्वामी साष्टांग नमस्कार”, असे केदार शिंदे यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा : Video : “साडीच्या रंगाचा परकर मिळाला नाही का?” रील व्हिडीओमुळे मानसी नाईक ट्रोल
दरम्यान केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा चौधरी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत असणार आहेत. तर याबरोबरच अभिनेते शरद पोंक्षे, पियुष रानडे यांच्याही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट ३० जून रोजी प्रदर्शित होणार आहे.